मुंबई – झी मराठी या वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय स्पर्धा सारेगम लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा आज संपन्न झाला. या महाअंतिम सोहळ्याची मानकरी गौरी गोसावी ही ठरली आहे.
अंतिम सोहळ्यात सात स्पर्धकांनी प्रवेश केला होता. त्यात ओंकार कानिटकर (ठाणे), गौरी गोसावी (मुंबई), प्रज्योत गुंडाळे (परभणी), सारंग भालके (संगमनेर), रित नारंग (मुंबई), पलाक्षी दीक्षित (विरार), स्वरा जोशी (मुंबई) यांचा समावेश होता. या सोहळ्यात स्पर्धकांनी अतिशय दर्जेदार गाणी सादर केली. हा सोहळा उत्तरोत्तर अतिशय रंगत गेला. या सोहळ्याची मोठीच उत्कंठा सर्वांनाच होती. या सातही स्पर्धकांचे आई-वडिल, कुटुंबिय आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षक या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच, हा सोहळा झी मराठीवर प्रदर्शित करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला हा सोहळा रात्री साडेदहा वाजेपर्यंत रंगला. प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थित होती. तसेच, मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
नक्की पहा हा महाअंतिम सोहळा.
नक्की पहा हा महाअंतिम सोहळा. @BYJUS 'सा रे ग म प लिटल चॅम्प्स' आज , संध्या. ७ वा. #Saregamapa #BYJUsOnSRGMP#LittleChamp #ZMLittleChamp #ZeeMarathi pic.twitter.com/DMF0O7mfCV— Zee Marathi (@zeemarathi) December 5, 2021
या सोहळ्यात उपविजेत्या पलाक्षी दीक्षित आणि स्वरा जोशी या दोन स्पर्धकांना ५० हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट व मानचिन्ह देण्यात आले. तर, सारंग भालके या स्पर्धकाला ७५ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट व मानचिन्ह देण्यात आले. त्यामुळे विजेत्याचा मान मिळविण्याची चुरस गौरी गोसावी आणि ओंकार कानिटकर यांच्यात होती. ओंकारला ७५ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट व मानचिन्ह देण्यात आले.