India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संकष्ट चतुर्थीनिमित्त द्राक्षांनी सजला दगडूशेठ गणपतीचा गाभारा; अनाथाश्रम, सेवाभावी संस्थांना द्राक्षांची प्रसाद भेट

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांच्या बागेतील ताजी, रसाळ, रसायनमुक्त शुध्द द्राक्षे शनिवारी (ता.11) पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी दाखल झाली. संकष्टी चतुर्थीच्या या दिवशी या 2 हजार किलो विविध रंगी द्राक्षांनी गणरायाचा गाभारा सजवण्यात आला.

द्राक्ष उत्पादन व निर्यातीत आघाडीवर असलेल्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी‘ मार्फत दरवर्षी फाल्गुनातील संकष्टी चतुर्थीला 2 हजार किलो द्राक्षे नैवद्य आणि प्रसाद स्वरुपात दगडूशेठ गणपतीला वाहीला जातो. गणरायाच्या आराशीनंतर लगेचच हा ताजा द्राक्षांचा प्रसाद भाविकांबरोबरच परिसरातील अनाथाश्रम, वृध्दाश्रम या सेवाभावी संस्थांना दिला जातो. द्राक्ष हंगामाच्या सुरवातीलाच हा हंगाम विनाविघ्न पार पडावा अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणरायाला करीत द्राक्षांचा नैवद्य वाहीला जातो. द्राक्षांची आकर्षक आरास भाविकांचेही लक्ष वेधून घेते.

शंभर टक्के शेतकऱ्यांची मालकी असलेल्या नाशिक येथील ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ताज्या, रसायनमुक्त द्राक्षांची आरास करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमित्त आज, शनिवारी (ता.11) दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ही द्राक्षे अर्पण करण्यात आली. ही द्राक्षे नंतर भाविकांमध्ये, ससून रुग्णालयातील रुग्णांना, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

नाशिक येथील सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचा प्रसाद सलग दुसऱ्या वर्षी फाल्गुनातील संकष्टी चतुर्थीला 2 हजार किलो द्राक्षे नैवद्य आणि प्रसाद स्वरुपात दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यात आली. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्षशेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांच्यावतीने साकडे घालण्यात येणार असल्याचे सह्याद्री फार्म्सच्या वतीने सांगण्यात आले.

द्राक्षांचा प्रसाद कशासाठी?
प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात.

Sankashta Chaturthi DagaduSheth Ganpati Grapes Aaras


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सुखप्राप्तीचा अतिशय सोपा, सरळ व खात्रीचा मार्ग

Next Post

पोलीस पाटीलांच्या मानधनवाढीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Next Post

पोलीस पाटीलांच्या मानधनवाढीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group