India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोलीस पाटीलांच्या मानधनवाढीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in राष्ट्रीय
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.

पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पुर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचा कालावधी हा 10 वर्षाचा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील पोलिस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. मानधनवाढ, जागा भरती याबाबत समितीची लवकरच बैठक घेण्यात येईल.
(विधानपरिषद । दि. 10 मार्च 2023)#police pic.twitter.com/iOjsBzJ2s6

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 10, 2023

DYCM Devendra Fadnavis on Police Patil Honorarium


Previous Post

संकष्ट चतुर्थीनिमित्त द्राक्षांनी सजला दगडूशेठ गणपतीचा गाभारा; अनाथाश्रम, सेवाभावी संस्थांना द्राक्षांची प्रसाद भेट

Next Post

कोतवालांचे मानधन आता एवढे झाले… बांधकाम परवानगीवेळी हे मिळणार…. जमिनीची नोंदणी इतक्या दिवसात पूर्ण होणार…

Next Post

कोतवालांचे मानधन आता एवढे झाले... बांधकाम परवानगीवेळी हे मिळणार.... जमिनीची नोंदणी इतक्या दिवसात पूर्ण होणार...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group