India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सातबारा उताऱ्यासाठी तब्बल ४० हजाराची लाच मागणारा तलाठी जाळ्यात; खासगी एजंटही एसीबीच्या सापळ्यात

India Darpan by India Darpan
April 22, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ सातबारा उतारा देण्यासाठी तब्बल ४० हजारांची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. धनराज नरसिंग राठोड (वय ४० वर्षे) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. राठोड हा तालुक्यातील चिखली येथे तलाठी आहे. याचप्रकरणात खासगी एजंटही सहभागी होता. योगेश विठ्ठल काशीद (वय ३३ वर्ष, व्यवसाय- टायपिंग सह्याद्री मल्टी सर्विसेस, रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला त्यांचा मंगळापूर येथील बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा हवा होता. तसेच, त्यावर वडील व इतर ११ जणांची नावे असलेला हा उतारा आवश्यक होता. त्यासाठी त्याने लाचखोर तलाठी राठोडला सांगितले. या मोबदल्यात ४० हजाराची मागणी राठोडने केली. तडजोडी अंती ३६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. लाचखोर तलाठी राठोडच्या सांगण्यावरुन लाचखोर खासगी एजंटने लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचखोर राठोड आणि काशीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सापळा अधिकारी
श्रीमती गायत्री म. जाधव , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 7588516042
सापळा पथक
पो. हवा. सचिन गोसावी. पो. ना. अजय गरुड . चा.पो.हवा.विनोद पवार .
 **मार्गदर्शक* 
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230, किंवा 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*

Sangamner ACB Trap Bribe Corruption Crime


Previous Post

एमपीएससी ३० एप्रिलच्या परीक्षेबाबत नियमावली जारी; हे राहणार अनिवार्य

Next Post

सिडकोतील गोळीबाराचा अखेर नाशिक पोलिसांनी लावला छडा; मध्य प्रदेशातून ७ जणांना अटक

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सिडकोतील गोळीबाराचा अखेर नाशिक पोलिसांनी लावला छडा; मध्य प्रदेशातून ७ जणांना अटक

ताज्या बातम्या

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023

फसवणूक थांबवा… असे करा घरबसल्या आधार अपडेट… जाणून घ्या अतिशय सोपी प्रक्रिया…

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group