India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ६ जागीच ठार, ७ जखमी… अपघातग्रस्तांना जवळपास तासभर मिळाली नाही मदत

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर एका कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार गतिरोधकाला धडकून उलटली. त्यामुळे कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळची आहे. प्रथमदर्शनी, कार अपघाताचे कारण टायर फुटल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक हा अपघात शिवनी पिसा गावाजवळ कारचा अपघात झाला. मारुती इर्टिगा या कारमध्ये एकूण १३ जण होते. हे सर्वजण शेगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. बुलढाण्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील गतिरोधकाला धडकून उलटली.

या अपघातात एक पुरुष, चार महिला आणि एका तरुणीसह सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले असून, त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी आणि मृत हे छत्रपती संभाजीनंगर शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर या सर्वांना जवळपास तासभर कुठलीही मदत मिळाली नसल्याचेही सांगितले जात आहे.

प्राथमिक तपासात कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. समृद्धी एक्सप्रेसवेवर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यानचा हा महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा आहे. हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे, ज्यामध्ये १७ अंडरपास बांधण्यात आले आहेत. हा द्रुतगती मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, जालना आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून जातो.

Samruddhi Highway Accident 6 Death 7 Injured


Previous Post

समलिंगी विवाहाबाबत केंद्र सरकारची ही आहे भूमिका; सर्वोच्च न्यायालयाला दिले प्रतिज्ञापत्र

Next Post

अमित शहांच्या स्वागतासाठी हैदराबादमध्ये ‘वॉशिंग पावडर निरमा’चे पोस्टर; अर्जुन खोतकर, नारायण राणेंचेही नाव

Next Post

अमित शहांच्या स्वागतासाठी हैदराबादमध्ये 'वॉशिंग पावडर निरमा'चे पोस्टर; अर्जुन खोतकर, नारायण राणेंचेही नाव

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group