मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमित शहांच्या स्वागतासाठी हैदराबादमध्ये ‘वॉशिंग पावडर निरमा’चे पोस्टर; अर्जुन खोतकर, नारायण राणेंचेही नाव

by Gautam Sancheti
मार्च 12, 2023 | 4:37 pm
in संमिश्र वार्ता
0
FrAxDF1WcAQeB9z

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री हैदराबादला पोहोचले. येथे त्यांनी हकिमपेट येथील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी (NISA) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 54 व्या स्थापना दिवस परेडला हजेरी लावली. दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी हैदराबादमध्ये ठिकठिकाणी ‘वॉशिंग पावडर निरमा’चे पोस्टर लावून भाजप आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे. या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा आहे.

या पोस्टरमध्ये भाजपच्या त्या आठ नेत्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे, जे एकेकाळी इतर पक्षात होते. पोस्टरवर वेलकम टू अमित शाह असेही लिहिले आहे. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षात असताना भाजपने ज्या लोकांवर आरोप केले होते, ते त्यांच्या पक्षात सामील होताच स्वच्छ आणि निष्कलंक होतात.

ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचे काम भाजप करते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस आमदार के. कविता यांचे नाव दिल्लीतील दारू घोटाळ्यात आले आहे. शनिवारीच तपास यंत्रणेने कविता यांची बराच वेळ चौकशी केली. त्यावरुनच बीआरस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

In addition to providing unbreachable security to institutions of national importance, the @CISFHQrs is today well-known for conducting rescue operations.

Delighted to be among the brave CISF personnel at their 54th Raising Day parade in Hyderabad. pic.twitter.com/hRQfXMrsBq

— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) March 12, 2023

दिल्ली-एनसीआरच्या बाहेर CISF स्थापना दिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सरकारच्या सूचनेनंतर दिल्लीबाहेर हे उत्सव आयोजित केले जात आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादला पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांशी राज्यातील ताज्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी हैदराबादमध्ये सीआयएसएफ फाउंडेशन डे परेडच्या नंतर पक्षाच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. सीआयएसएफच्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर शाह सकाळी 11.30 च्या सुमारास केरळला रवाना झाले. तेथे ते त्रिशूरमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत.

Hyderabad Amit Shah Welcome Poster Washing Powder Nirma

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ६ जागीच ठार, ७ जखमी… अपघातग्रस्तांना जवळपास तासभर मिळाली नाही मदत

Next Post

पेटीएम पेमेंट्स बँकेची यूपीआय लाइट सुविधा; ग्राहकांना असा होणार फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Image

पेटीएम पेमेंट्स बँकेची यूपीआय लाइट सुविधा; ग्राहकांना असा होणार फायदा

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011