अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्याची शेती आधुनिक व यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत होऊ लागली असली तरी अनेक शेतकरी एखादी बैल जोडी आपल्या गोठ्यात ठेवताच असतो. नाशिक जिल्ह्यातील बागलांणच्या नामपूर बाजार समितीत ऐका शेतकऱ्याच्या बैल जोडीला तब्बल साडे तीन लाख रुपये मिळाले आहे. मालेगाव तालुक्यातील गाळणे येथील भास्कर सोनवणे यांची ही खिल्लारी बैल जोडी कळवणच्या बाळू बागुल यांनी खरेदी केली असून, बैल जोडी घेतल्यानंतर त्यांनी थेट डीजे लावत आनंद साजरा केला.