इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इकीकडे लोकसंख्या नियंत्रणाची भाषा केली जात असली तरी रशियाला मात्र अल्प लोकसंख्येची मोठी भीती वाटत आहे. त्यामुळेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या देशातील लोकसंख्याशास्त्रीय संकट दूर करण्यासाठी पुतिन यांनी अभिनव योजना सुरू केली आहे. १० किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना तब्बल १० लाख रुबल (१३ लाख रुपये) देण्याची घोषमा करण्यात आली आहे.
रशियन राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टाइम्स रेडिओवर प्रसारक हेन्री बोन्सू यांच्याशी नवीन रशियन बक्षीस योजनेबद्दल माहिती दिली. या योजनेला ‘मदर हिरोईन’ असे नाव देण्यात आले आहे. रशियाची कमी होत चाललेली लोकसंख्या भरून काढण्यासाठी पुतिन यांनी ही घोषणा केली आहे. या वर्षी मार्चपासून रशियामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी युक्रेनसोबतच्या युद्धात ५० हजाराहून अधिक अधिक सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
डॉ. मॅथर्स म्हणाले की, पुतिन हे सांगत आहेत की मोठे कुटुंब असलेले लोक अधिक देशभक्त असतात. सोव्हिएत काळातील हा पुरस्कार ज्या महिलांना दहा किंवा त्याहून अधिक मुले आहेत त्यांना दिला जातो. तिला मदर हिरोईन म्हणतात. युक्रेनसोबतच्या युद्धाच्या संकटात रशियाची लोकसंख्या पुनर्संचयित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.”
या योजनेनुसार, महिलांना १० लाख रूबल म्हणजेच १३ लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. हे पैसे त्यांच्या दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला दिले पाहिजेत. मात्र, इतर नऊही टिकले पाहिजेत, अशी अट आहे. युक्रेनमधील युद्धाव्यतिरिक्त, कोविड-१९ महामारीने रशियाची लोकसंख्या खूपच मागे टाकली आहे. “रशियन महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी आणि खरोखरच मोठी कुटुंबे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा एक प्रयत्न आहे,”
दरम्यान, याबाबत तज्ज्ञ म्हणतात की, १३ लाख रुपयांमध्ये १० मुलांना वाढवण्याची कल्पना कोण करू शकते? या दरम्यान ते सर्व कुठे राहणार आहेत? रशियाला अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या आहेत.”
Offer 10 Child Birth Women Will Got 13 Lakh
USSR Russia Vladimir Putin