India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात नवा ट्विस्ट… अनिल परबांना दिलासा कसा काय मिळाला?

India Darpan by India Darpan
May 9, 2023
in राज्य
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासातून कथित मनी लाँड्रिंगचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दस्तुरखुद्द सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नसल्याने त्यांना दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये ईडीने परब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून, दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले होते, ज्याची किंमत १० कोटींहून अधिक आहे.

परब यांनी कदम यांच्याशी मिळून स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडून केवळ कृषी जमिनीचे अकृषिक वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली आणि सीआरझेडचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले, असे ईडीने म्हटले आहे.जमिनीचा वापर कृषीवरून बिगरशेतीमध्ये बदलण्याची परवानगी मिळवण्यासाठी कदम यांनी त्याच्या पूर्वीच्या मालकाची बनावट स्वाक्षरी केली, असाही आरोप केला आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्यांचे एकूण उत्पन्न १०.२ कोटी रुपये होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात सदानंद कदम आणि माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे नाव आहे. तर परब यांच्या नावाचा उल्लेख नाही, हे विशेष!

Sai Resort Money Laundering Anil Parab ED Charge Sheet


Previous Post

नाशिक होणार क्वालिटी सिटी… मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार… असा होणार फायदा…

Next Post

धक्कादायक! भाजप नेत्यांमुळेच राजस्थानात फसले ‘ऑपरेशन लोटस’; कसं काय? असे झाले उघड

Next Post
संग्रहित छायाचित्र

धक्कादायक! भाजप नेत्यांमुळेच राजस्थानात फसले 'ऑपरेशन लोटस'; कसं काय? असे झाले उघड

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group