मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये प्रेमाचे उदाहरण मानले जाते. मस्ती, हाऊसफुल सारखे हिट चित्रपट देणारा रितेश प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यातही खूप यशस्वी आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रितेश आणि जेनेलिया यांनी नवी आलिशान कार खरेदी केली आहे. त्याची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.
रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट 2002 मध्ये त्यांच्या डेब्यू फिल्म ‘तुझे मेरी कसम’च्या शूटिंगसाठी झाली होती. हैदराबाद विमानतळावर त्यांची भेट झाली. रितेश हा हीरो असला तरी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे जेनेलियाला माहित होते. त्यात खूप गर्व किंवा अभिमान असावा असे त्याला वाटले होते, पण तिला नंतर त्याचा स्वभाव समजला. आज अभिनेता रितेश देशमुखने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. रितेश हा सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे.
बायको जेनेलियासोबतचे त्याचे भन्नाट रिल्स क्षणात व्हायरल होतात. पण सध्या चर्चा त्याची नाही, तर रितेश व जेनेलियाच्या नव्या कारची आहे. यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. बॉलिवूडच्या या मोस्ट लव्हिंग कपलने लक्झरी BMW iX ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी याच रॉयल कारमधून या कपलची एन्ट्री झाली.
रितेश व जेनेलिया मरून कलरच्या कारमधून आलेत आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. या कारची किंमत 1.16 कोटी रूपये आहे. मुंबईत या कारची ऑनरोड प्राइज सुमारे 1.43 कोटी आहे. खरे तर रितेश कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
रितेश व जेनेनियाची पहिली भेट 2003 मध्ये त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्यावेळी म्हणजे ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाले. तेव्हा जेनेलिया केवळ 16 वर्षांची होती तर रितेश 25 वर्षांचा होता. दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा एकमेकांच्या मैत्रीची त्यांना इतकी सवय झाली होती की ते कधी प्रेमात पडले ते कळलेही नाही. यानंतर त्यांनी मस्ती चित्रपटातही एकत्र काम केले. या दोघांचे नाते पहिल्या चित्रपटापासून सुरू झाले होते, मात्र त्यांनी ही बातमी मीडियात येऊ दिली नाही. अखेर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाआधी ते 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते पण त्यांच्या अफेअरच्या बातम्या कधीच मीडियात उघडपणे आल्या नाहीत. दोघांना रियान आणि राहिल हे दोन मुले आहेत.
Actor Ritesh Deshmukh Actress Genelia Buy New Luxurious Car
Bollywood Entertainment BMW Automobile