अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रेल्वेने प्रवास करण्यासाठी आयआरसीटीसी वरून तिकीट बुक करण्याला अनेकांचे प्राधान्य असते. वैयक्तिक सहली असो वा व्यावसायिक. बुकिंग करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करणं अनेकांना सुरक्षित वाटतं. अशा सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आयआरसीटीसी युझर्सला एका आयडीवरून एका महिन्यात १२ तिकिटे बुक करता येणार आहेत.
अलीकडेच, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याबद्दल माहिती शेअर केली आहे. आयआरसीटीसीने ट्विटमध्ये लिहिले की, “जर तुम्ही नोंदणीकृत आयआरसीटीसी युझरअसाल, तर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक करून घ्या. या माध्यमातून तुम्हाला एका महिन्यात १२ तिकिटे बुक करता येतील. हल्ली पारदर्शकतेसाठी आधार कार्ड लिंक करणे सर्वत्रच बंधनकारक झाले आहे. तसेच आयआरसीटीसी युझर्सला त्यांचे खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक केल्यावरच एका महिन्यात १२ तिकिटे बुक करता येणार आहे.
असे करा आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक
– सर्वप्रथम आयआरसीटीसी च्या अधिकृत वेबसाइट http://irctc.co.in वर जा.
– खात्यात लॉग इन करा आणि मुख्यपृष्ठावरील ‘My account’ पर्यायामध्ये ‘लिंक युवर आधार’ वर क्लिक करा.
– यानंतर आधारशी संबंधित माहिती भरा आणि चेक बॉक्समध्ये जा आणि ‘ओटीपी पाठवा’ हा पर्याय निवडा.
– आता OTP टाकताना, Verify OTP निवडा.
– केवायसी पूर्ण झाल्यानंतर, आधार आयआरसीटीसी खात्याशी जोडला जाईल.
माहिती अपडेट करा
तिकीट बुक करण्यासाठी, प्रवाशाने आधारशी आपले प्रोफाईल, माहिती पडताळून घेणे महत्वाचे आहे. ‘माय प्रोफाइल’ या पर्यायामध्ये ही माहिती आपण पडताळून पाहू शकतो. तिकीट बुक करण्यापूर्वी, प्रवाशाचे नाव आणि आधार कार्ड तपशील अपडेट असणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच बुकिंग करता येणार आहे.
If you are a #IRCTC registered user you can now link your Aadhar with your #IRCTCaccount and book upto 12 #Train #tickets in a month@AmritMahotsav
— IRCTC (@IRCTCofficial) March 15, 2022