बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्विस ब्युटीचे ‘क्रेज’ कलेक्शन….मनाला भुरळ पाडणारे हे आहे उत्पादन

by India Darpan
मे 22, 2024 | 12:14 am
in संमिश्र वार्ता
0
Swiss Beauty Craze for GenZs 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या स्विस ब्युटीने क्रेज हे आपले जेन्झी मेकअप कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. एकाच वेळी अनेक कामांमध्ये गुंतलेल्या मल्टी-टास्कर जेन-नेक्स्ट लोकसंख्येसाठी विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा यात समावेश आहे. क्रेज कलेक्शनमध्ये आयशॅडो आणि ब्लश पॅलेट ते मस्कारासारख्या डोळ्यांच्या मेकअपपासून ते लिप बामपासून १२ तास राहणाऱ्या लिप क्रेऑन्ससारख्या ओठांसाठीच्या उत्पादनांपर्यंत ते प्रायमर आणि फिक्सरसारख्या चेहऱ्यासाठीच्या उत्पादनांच्या श्रेणीपर्यंतच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या उत्पादनांचे विपुल पर्याय उपलब्ध आहेत.

या उत्पादनांसाठी वापरण्यात आलेले ट्रेण्डी पॅकेजिंग आणि फॉर्म्युले जेन झेडच्या खास बोलीभाषेत – स्लॅन्ग्जमध्ये ठेवण्यात उत्पादनांची नावे आणि बहुउपयोगी उत्पादने ही वैशिष्ट्ये असलेले क्रेज तरुणाईचा ध्यास व स्वत:ला बिनधास्तपणे व्यक्त करण्याची वृत्ती यांचा उत्सव साजरा करत आहे. यात चेहरा, ओठ व डोळ्यांसाठी नजरेत भरणारे रंगांचे पर्याय आणि नाविन्यपूर्ण मेकअप फॉर्म्युले उपलब्ध आहेत. या कलेक्शनमधील सर्व सौंदर्य उत्पादने बहुउपयोगी आणि उच्च दर्जाची कामगिरी करणारी आहेत. यामुळे क्रेज मधील प्रसाधने सर्वांना परवडण्याजोगी असून सौंदर्यप्रसाधनाच्या जगातील नवनवे कल युवा व प्रवासी ग्राहकांच्या आवाक्यात राहावेत याची काळजी यात घेण्यात आली आहे.

स्विस ब्युटीचे सीईओ श्री. साहिल नायर म्हणाले, “आमची क्रेज मेकअप श्रेणी उत्साहाने भारलेल्या आणि अष्टपैलू अशा जेन्झीसाठी आहे, जी कॉलेजमधील पदार्पण करताना, पदवीधर होताना, नोकरीवर रुजू होताना अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला ठसा उमटवत आहेत. या श्रेणीतील उत्पादनांचे उठावदार रंग, वैविध्यपूर्ण फॉर्म्युले आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्व यात जेन झेडच्या कोणत्याही बंधनांना न जुमानणाऱ्या उर्मींचे प्रतिबिंब पडले आहे. या कलेक्शनद्वारे तरुण मुली नवे प्रयोग करू शकतात, नव्या लुक्सचा शोध घेऊ शकतात आणि मेकअपच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करू शकतात. भारतीय सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात ११ वर्षांच्या प्रभावशाली अस्तित्वाद्वारे स्विस ब्युटीने भारतीय बाजारपेठेची नस अचूक पकडली आहे आणि आता क्रेजच्या रूपाने जेन झेडची रंगीत कॉस्मेटिक्सची आजवर अपूर्ण राहिलेली गरजही पूर्ण कऱण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. वैविध्यपूर्ण, बहुउपयोगी आणि ट्रेण्डी मेकअप उत्पादने ही खास जेन झेडसाठी, या पिढीशी संवाद साधण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.”

“जेन झेड हा भारताच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर गटाचा सर्वात वेगाने वाढत असलेला ग्राहकवर्ग आहे. तरुणाईवर लक्ष केंद्रित करणारा ब्रॅण्ड म्हणून दर्जा, नाविन्यपूर्णता आणि ट्रेण्डी स्वभावामधून आपल्या या ग्राहकवर्गाशी खरेखुरे नाते निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.” ते पुढे म्हणाले.

स्विस ब्युटी क्रेजकडे ५५० हून अधिक शहरांतील किरकोळ विक्रीस्थानांचे जाळे आहे व संपूर्ण भारतामध्ये १२० हून अधिक सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित आउटलेट्समध्ये त्यांचे मुख्यत्वे अस्तित्व दिसून येते. क्रेजची सर्व उत्पादने आता नायका, अमेझॉन, मिंत्रा, पर्पल इत्यादी अग्रगण्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. अलीकडेच बाजारात दाखल झालेली कंपनीची मायक्रो वेबसाइट म्हणजे अनोखेपणाने आणि नेत्रदीपक फॉर्म्युलेशन्सनी बाजारपेठेत लोकप्रिय होत असलेली नवनवी मेकअप उत्पादने एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली…सीसीटीव्हीमुळे संशयित ताब्यात

Next Post

पुणे अपघात प्रकरणात राहुल गांधींचा संताप….व्हिडिओ शेअर करत दिली प्रतिक्रिया

India Darpan

Next Post
Untitled 78

पुणे अपघात प्रकरणात राहुल गांधींचा संताप….व्हिडिओ शेअर करत दिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011