India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

१२ खंड… ३० देश… १ लाख किमी प्रवास… नऊवारी साडी घालून ही पुणेरी तरुणी बाईकवर करणार जगभ्रमंती…

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  पुण्याच्या मानात आणखी एक तुरा लावण्यासाठी मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरी महिला रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीसाठी 9 मार्चला निघणार असून सुमारे 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्यामाध्यमातून बनविण्यात आलेले विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशा पर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.

रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार रमिला लटपटे 9 मार्च 2023 रोजी सांयकाळी 4.30 वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्‍विनी जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.

तसेच महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच ह्या जगभ्रमंतीचा घाट घातला आहे. काही दिवसापुर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती,या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक ही केले होते. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.

Pune Young Girl Bike World Tour Record


Previous Post

इंडिया दर्पण विशेष – वास्तू शंका समाधान – घराच्या आग्नेय कोपऱ्यात नेमके काय असावे आणि काय नसावे?

Next Post

पुण्यात स्मशानघाटावर तासनतास वेटिंग… ट्रॅफिक जाम… नागरिकांच्या संयमाची परीक्षा..

Next Post

पुण्यात स्मशानघाटावर तासनतास वेटिंग... ट्रॅफिक जाम... नागरिकांच्या संयमाची परीक्षा..

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group