India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्यात स्मशानघाटावर तासनतास वेटिंग… ट्रॅफिक जाम… नागरिकांच्या संयमाची परीक्षा..

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in राज्य
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील वैकुंठधाम या स्मशानघाटावरील विद्युतदाहिनी बंद असल्यामुळे प्रेत जाळण्यासाठी तासनतास विलंब लागत आहे. स्मशानभूमीवरील या प्रकाराने पुणेकर चांगले संतप्त झाले आहेत.

पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठात मागील काही दिवसांपासून प्रेतांची रांग बघायला मिळत आहे. वैकुंठात असलेल्या गैरसोयीमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वैकुंठ येथे तीन विद्युतदाहिनी आणि एक गॅसदाहिनी आहे. त्यातील दोन दाहिनी बंद आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ लागत आहे. एका मृत व्यक्तीला अग्नी दिल्यावर ती दाहिनी थंड होण्यासाठी किमान तीन तास लागतात. त्यामुळे दुसऱ्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा खोळंबा होत आहे. विद्युतदाहिनी बंद असल्यामुळे अनेक नातेवाईकांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वैकुंठात प्रेतांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

एका मृत व्यक्तीसोबत त्यांच्या सामाजिक वावरानुसार १२ ते ६० व्यक्ती येतात. त्यामुळे वैकुंठात एक प्रेत अंत्यसंस्कारासाठी आलं तरीही गर्दी होते. त्यात जर रोज किमान चार ते पाच अंत्यसंस्कार पार पडणार तर वैकुंठात मोठी गर्दी होते. त्यामुळे वैकुंठातील सुविधेबाबत अनेक मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. वैकुंठातील स्वच्छतागृहे आणि स्नान सुविधेबाबत सातत्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात होत्या. स्वच्छतागृहांच्या सुशोभीकरणासह स्नानसुविधेमध्येही बदल करण्यात येणार आहेत, असं सांगितलं मात्र ते झालं नसल्याचं समोर आलं आहे. विद्युतदाहिनीजवळील मोकळ्या जागेतच दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे पार्किंग होत असल्याने त्यासाठी वेगळ्या व्यवस्थेसंदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहे.

सुविधा व्हाव्यात उपलब्ध
सकाळी गारठा तर दुपारी कडाक्याचं ऊन जाणवत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांचे उन्हात हाल होत आहेत. वैकुंठात पाण्याची सोय नाही आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी लहान कॅन्टिन होतं. मात्र गोळीबार झाल्यानंतर कॅन्टिन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे वैकुंठात योग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी परिवर्तन संस्थेच्या डॉ. शैलेश गुजर यांनी केली आहे.

Pune Cremation Vaikuntha Traffic Jam Waiting


Previous Post

१२ खंड… ३० देश… १ लाख किमी प्रवास… नऊवारी साडी घालून ही पुणेरी तरुणी बाईकवर करणार जगभ्रमंती…

Next Post

अश्लिल भाषेमुळे या वेबसिरीज विरोधात दाखल होणार गुन्हा; न्यायालयाचे निर्देश

Next Post

अश्लिल भाषेमुळे या वेबसिरीज विरोधात दाखल होणार गुन्हा; न्यायालयाचे निर्देश

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group