India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रवचनकार प्रमोद केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
September 4, 2022
in क्राईम डायरी
0

 

रागयड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलिबाग तालुक्यातील वर्तक आळी, चौल येथे राहणारे व धार्मिक अध्यात्मिक प्रवचनकार प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवंदडा पोलिस ठाण्यात पिडित महिलेने तक्रार दिली. त्यावरून भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 376, 313,354 504, 506 नुसार बलात्कार, लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेवदंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रमोद दिनानाथ केणे यांनी सदर महिलेची फसवणूक केली. मी दत्तभक्त आहे. दत्तांनी मला साक्षात्कार दिला आहे. दत्तानी मला तुला मदत करण्यासाठी पाठविले आहे. तूला मी कंपनीत काम देतो, असे सांगून या महिलेची फसवणूक केली. तिला गाणगापूर येथे नेले. त्यांनंतर भाईंदर येथील एका खोलित सदर महिलेला डांबून ठेवले व जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचारामुळे सदर महिला गर्भवती राहिली. मात्र, केणे यांनी या महिलेला औषध पाजवून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. त्यानंतर सदर पीडित महिलेला अलिबाग येथे एका रूममध्ये ३ वर्षे बंदिस्त ठेवण्यात आले.

पीडितेने तक्रारीत लिहिले आहे की, सतत ३ वर्षे प्रमोद केणी यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. शारिरीक व मानसिक त्रास दिला. 9 वर्षे कामावर ठेवून घेऊन घरकामाला लावले. विविध कामे करण्यास सांगितले. 4000 रुपये महिना पगार देतो असे सांगितले. 9 वर्षाचे महिन्याला 4000 रूपये प्रमाणे एकूण 4,32,000 इतका पगार झाला. परंतू एक रुपयाही प्रमोद केणे यांनी दिला नाही. आर्थिकही फसवणूक झाली. त्यानंतर प्रमोद केणे यांनी शारीरिक मानसिक,आर्थिक शोषण केल्यानंतर महिला आजारी पडली. तिचा काहीच उपयोग नसल्याने सदर महिलेला गुजरातमधील गरुडेश्वर येथे दुसऱ्यां मार्फत नेऊन सोडले. झालेला अन्याय सहन न झाल्याने पीडित महिला गरुडेश्वर येथे असलेल्या एका नदीत आत्महत्या करायला गेली. एका साधूने तिचे प्राण वाचविले. त्या साधुला तिने सर्व हकीगत सांगितले. महिलेच्या अंगावर असलेल्या जखमा बघून त्या साधूने तिला योग्य ठिकाणी नेऊन तिच्यावर उपचार केले. पूर्ण बरी झाल्यानंतर महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 12 तोळे सोने, साडेतीन लाख रुपये घेऊन, पगाराची सुमारे 4,32,000 रूपये न देता व अज्ञानाचा फायदा घेत 1996 ते 2014 या काळात प्रमोद दीनानाथ केणे यांनी इच्छेविरुद्ध वेळोवेळी लैंगिक शोषण करून गर्भपात घडवून आणला. अशी रीतसर तक्रार (FIR )सदर महिलेने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.

रेवदंडा पोलिस ठाण्यात प्रमोद दीनानाथ केणे यांच्या विरोधात दिनांक 20/8/2022 रोजी बलात्कार,मारहाण, धमकी अशा गंभीर गुन्हयांची तक्रार(FIR )दाखल झाली असून सदर प्रकरणी माननीय अलिबाग न्यायालयाने दिनांक 29/8/2022 रोजी अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.सदर प्रकरणातील प्रमोद दीनानाथ केणे हे फरार असून त्यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. सदर इसम स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणव‌तो व धार्मिक विषयावर प्रवचन देत सर्वत्र फिरत असतो. अलिबाग येथील आंबेपूर येथे शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या नावाने विविध प्रकारचे पूजा अर्चा करवितो व महिलांना विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो.व नंतर त्यानंतर त्या महिलांचे शारिरिक मानसिक शोषण करतो त्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा करतो असे पिडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगीतले आहे. एवढे मोठे प्रकरण होऊन सुद्धा, गंभीर गुन्हा दाखल होऊनसुद्धा प्रमोद दीनानाथ केणी यांचा अजून तपास लागला नाही.याबद्दल जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रमोद दीनानाथ केणे नेमके कुठे आहेत याचा तपास रेवदंडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत.

Pravachankar Paramod Kene Rape Case Booked
Revdanda Police Station Kokan


Previous Post

अल्पदरात बीएमडब्ल्यु कार देण्याचे आमिष; दोन जणांना १० लाखाचा गंडा

Next Post

रेल्वे मालगाडीचे इंजिन थेट शेतात घुसले (व्हिडिओ)

Next Post

रेल्वे मालगाडीचे इंजिन थेट शेतात घुसले (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group