India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रेल्वे मालगाडीचे इंजिन थेट शेतात घुसले (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 4, 2022
in संमिश्र वार्ता
0

सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  जिल्ह्यातील करमाळ्यात एका मालगाडीचा अपघात झाला असून या रेल्वेगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे कळाले आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचं नुकसान झालं. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरले. करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. सोलापूरहून पुणे मार्गावर रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. या ट्रॅक वरून सिमेंटने भरलेली मालगाडी ही पुण्याच्या दिशेने जात होती. आज पहाटेच्या सुमारास ही रेल्वे गाडी रुळावरून खाली उतरली व थेट केम हद्दीतील खाणट यांच्या शेतात जाऊन थांबली. यावेळी रेल्वेचे इंजिनसह दोन डबे हे शेतात तर काही डबे रुळा खाली गेल्याचे दिसून आले.

याबाबत संबंधित विभागाला माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी क्रेन उपलब्ध करण्यात आली. काम पूर्ण करत रेल्वे पुन्हा एकदा पुढील दिशेने रवाना करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत परिसरात एका बाजूची रेल्वे लाईन बंद ठेवण्यात आली होती. सकाळच्या सुमारास आज केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले. सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आता आली आहे.

सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झालाय. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जाईल. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकाकडून पुढील गोष्टी सुरळीत व्हाव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवानं ही मालगाडी असल्यानं यात कोणतेही प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होता. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे. असं असलं तरी आर्थिक नुकसान झालंय. मालवाहू ट्रेनमध्ये सिमेंट असल्याची माहिती मिळली आहे.

अपघातानंतर या मालगाडीच्या चालकासोबत मालगाडी वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन नेमकं काय घडलं, याबाबत अधिक माहिती घेण्यात आली. अपघात झाल्याची माहिती प्रशासनाला आणि स्थानिकांना समजताच अनेकांना धक्का बसला. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वेचे घसरलेले डबे आणि परसलेलं सामान पूर्ववत करण्यात आले. सदर रेल्वे अपघात नेमका का झाला, मालगाडीत काही बिघाड झाला होता का? किंवा यामागे कुणाचा घातपात घडवण्याचा कुणाचा विचार होता का?, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.

🚨 #BREAKING l #Maharashtra l #Solapur

Goods train headed from Solapur to Pune derailed; Incident near Kem (Karmala) pic.twitter.com/beq5viBFAI

— Pranjal Mishra 🇮🇳 (@PranjalmishraIN) September 4, 2022

Goods Train Accident Engine Side Track Farm Video
Karmala Solapur


Previous Post

प्रवचनकार प्रमोद केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

रिलायन्स जिओला सहा वर्षे पूर्ण: अशी आहे कंपनीची आजवरची वाटचाल; वाचून तुम्ही थक्कच व्हाल!

Next Post

रिलायन्स जिओला सहा वर्षे पूर्ण: अशी आहे कंपनीची आजवरची वाटचाल; वाचून तुम्ही थक्कच व्हाल!

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group