नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पदरात कार देण्याचे आमिष दोन जणांना १० लाखाचा गंडा घातलणा-या विरुध्द गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमडब्ल्यु कंपनीमध्ये उच्च पदावर असल्याचे सांगून संशयित अमितकुमार घोष यांनी ही फसवणूक केली आहे. या फसवणूकप्रकरणी चेतन मारुती प्रभू (रा. गोकुळ शंकरनगर, गंगापूर पोलीस स्टेशनसमोर, गंगापूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. घोष याने प्रभू यांना आपण बीएमडब्ल्यू कंपनीमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एरिया सेल्स साउथ ईस्ट आशिया या पदावर असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर बीएमडब्ल्यूची टू सिरीज गाडी ही मूळ रकमेच्या ५५ टक्के कमी दरात घेऊन देतो असे आमिष दाखवले. या आमिषाला प्रभू बळी पडले.
त्यानंतर प्रभू यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी घोष आयटीजीएसद्वारे ५ लाख रुपये ट्रान्सफर केले. याचप्रमाणे प्रभू यांचे मित्र अरुणकुमार दाना यांनही ११ एप्रिल २०२२ रोजी ४ लाख रुपये ट्रान्सफर केले. बँक खात्यात ट्रान्सफर करण्याबरोबरच ५० हजार रुपये रोख व ५० हजार रुपये संशयित घोष यांच्या पत्नीच्या अकाऊंटवर ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले. असे प्रभु व दाणा यांच्या दोघांकडून ५-५ लाख असे १० लाख रुपये संशयित घोष याने घेतले. पण, त्यांना कार मिळाली नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रभू यांनी फसवणूकीची तक्रार केली. या फसवणूक प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे हे अधिक तपास करीत आहेत.