India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

India Darpan by India Darpan
September 4, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रस्ता अपघातात आज निधन झाले आहे. पालघरजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबई-अहामदाबाद महामार्गावर हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला येत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले आहे. मिस्त्री हे त्यांच्या वाहन चालकासह प्रवास करीत होते. त्यांची आलिशान मर्सिडीज कार दुभाजकावर जोरदार आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सायरस आणि त्यांचा ड्रायव्हर ठार झाला तर दोन जण जखमी झाले. त्यांचे वडील आणि मोठे उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे या वर्षी २८ जून रोजी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हिंग सीटवर एक महिला होती. मिस्त्री बाजूच्या सीटवर बसले होते. मागे आणखी दोन जण बसले होते. अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

सायरस हे टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष होते. काही वादांमुळे त्यांना चार वर्षांतच अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर रतन टाटा यांनी स्वतः अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. नंतर २०१७ मध्ये एन चंद्रशेखरन यांना हे पद देण्यात आले.

मशहूर उद्योगपति व @TataCompanies के पूर्व प्रमुख साइरस मिस्त्री का अहमदाबाद मुंबई एक्सप्रेस वे में एक्सीडेंट की वजह से निधन।।#cyrusmistri pic.twitter.com/oAW2fPl0Sz

— अविनाश तिवारी/Avinash Tiwari (@tiwariavinash) September 4, 2022

सायरस मिस्त्री यांच्याविषयी
सायरस मिस्त्री हे ज्येष्ठ उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे सुपूत्र आहेत. मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले होते. शिवाय त्यांनी लंडनच्याच इम्पिरियल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. सायसर २००६ मध्ये टाटा उद्योग समूहाचे सदस्य बनले. २०१३ मध्ये म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षी ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. मात्र, २०१६ मध्ये या टाटा समुहात मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. या निर्णयाविरोधात ते न्यायालयात गेले. पण, त्याच्या विरोधात निकाल लागला.

सायसर हे शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी या उद्योग समुहाचे उत्तमरित्या नेतृत्व केले आणि वेगळी दिशा दिली. पालोनजी ग्रुप विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कापड, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, बिझनेस ऑटोमेशन अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे.

Industrialist Cyrus Mistry Road Accident Death
Palghar Car Shapoorji Pallonji Industry Group


Previous Post

मविप्रच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; कर्ज फेडण्यासाठी या नेत्यांनी जाहीर केली दीड कोटीची देणगी

Next Post

अल्पदरात बीएमडब्ल्यु कार देण्याचे आमिष; दोन जणांना १० लाखाचा गंडा

Next Post

अल्पदरात बीएमडब्ल्यु कार देण्याचे आमिष; दोन जणांना १० लाखाचा गंडा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

घर खरेदीसाठी ग्राहकांची ठाणे पश्चिम, मीरारोड पूर्वला सर्वाधिक पसंती

March 29, 2023

कोणतेही काम करताना खूप अडचणी येतात? हे उपाय नक्की करुन पहा…

March 29, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा आणखी एक मार्ग आहे

March 29, 2023

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group