India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मविप्रच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; कर्ज फेडण्यासाठी या नेत्यांनी जाहीर केली दीड कोटीची देणगी

India Darpan by India Darpan
September 4, 2022
in स्थानिक बातम्या
0

मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार,माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा.बाळासाहेब पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नूतन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, चिटणीस दिलीप दळवी,संचालकांचा शरद पवार व छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना संस्थेवर ६० कोटी कर्ज आणि इतर देणे ७० कोटी असे १३० कोटीचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त करून संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी १ कोटीची देणगी त्यांनी जाहीर करून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत:पासून सुरुवात करून आपआपल्या रकमा संस्थेसाठी जमा करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी छगन भुजबळ,दिलीप बनकर,माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येकी ५-५ लाखाची तर देविदास पिंगळे आणि विश्वस्तांनी प्रत्येकी लाख-लाख रुपयाची देणगी जाहीर केली. याप्रमाणे दीड कोटी रुपये जमा झाले. समाजाकडून देणग्या गोळा करून कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी संचालक सर्वश्री डॉ.सयाजीराव गायकवाड,रविंद्र देवरे,प्रविण जाधव,लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, संदीप गुळवे,अमित पाटील, डॉ.प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णा भगत, विजय पगार, रमेश पिंगळे,यांच्यासह संस्थेचे सनदी लेखापाल राजाराम बस्ते,विजय गडाख,अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

असे जाहीर झाले देणगीचे आकडे
संस्थेवर असलेल्या कर्जाबाबत शरद पवारांनी ती कर्जमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगत कार्यकारिणी मंडळ यांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याला त्वरित सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दुजोरा देत एक लाख रुपये देणगी जाहीर केली. त्यानंतर सर्व कार्यकारिणीने देखील देणगी जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने एक कोटीची देणगी देत संस्थेप्रती असलेला जिव्हाळा अधोरेखित केला.

पवार साहेब आमच्या पाठीशी
मवीप्र संस्थेत परिवर्तन पॅनलने बाजी मारल्यानंतर देशाचे नेते शरद पवार यांची सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांच्या सोबत मुंबईत भेट घेतली. स्वतः पवार साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी सर्व सभासदांचे विशेष आभार मानले. संस्थेच्या सद्यस्थिती विषयी त्यांनी माहिती जाणून घेत त्यावरील उपाययोजना बाबत माहिती घेतली. सर्व नूतन कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
ॲड.नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस मविप्र


Previous Post

गर्लफ्रेंडची हौस भागावी म्हणून त्याने केला हा उद्योग; व्हॉटसअॅप स्टेटसने असा झाला भांडाफोड

Next Post

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

Next Post

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताची चर्चा

September 26, 2023

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group