India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘विधानसभा निवडणुकीत २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवेल, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही’ जयंत पाटलांचा जोरदार टोला

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in Short News
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपला स्थानिक पक्ष, राज्यस्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो या शत्रू असो त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असेही जयंत पाटील म्हणाले.

शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच आणि यदाकदाचित राहिला तर भाजप सर्वे करेल आणि जाहीर केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

अजून सव्वा वर्ष निवडणुकीला असताना ४८ जागा शिंदे गटाला आहेत ते निवडणूकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या किंवा शिंदे गटाच्यावतीने जो काही त्यांचा पक्ष असेल त्याना ५-६ जागा मिळतील बाकीच्या सगळ्या भाजपच्या नावावर लढवल्या पाहिजे असे ऐनवेळी शिंदेंना सांगितले जाईल असेही जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

Politics NCP Chief Jayant Patil on Shinde Group and BJP


Previous Post

लालपरीची सवारी, महिला घेई भरारी… भाजप नेत्या चित्रा वाघांचा नाशिक-मालेगाव एसटीने प्रवास

Next Post

चंबळ नदीत १७ बुडाले… ८ जणांना वाचविण्यात यश…. ३ मृतदेह सापडले… चौघांचा शोध सुरू…

Next Post

चंबळ नदीत १७ बुडाले... ८ जणांना वाचविण्यात यश.... ३ मृतदेह सापडले... चौघांचा शोध सुरू...

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group