शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रामदास आठवले आणि राजू शेट्टी दिसणार या चित्रपटात! या महिना अखेरीस प्रदर्शित होणार

ऑगस्ट 8, 2022 | 5:34 am
in मनोरंजन
0
hqdefault

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेते किंवा अभिनेत्री यांनी राजकारणात प्रवेश करणं काही नवं नाही. राजकारण आणि अभिनय दोन्ही उत्तमपणे सांभाळणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे. पण आता मुरलेले राजकारणी अभिनय करताना दिसले तर नवल वाटायला नको. मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय. या राजकारण आणि सत्ता असं कथानक असलेला हा चित्रपट आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शेतकरी नेते राजू शेट्टी दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नावे आहेत. आत हे दोघेही राजकारणातून थेट चित्रपटात एन्ट्री करणार आहेत. रामदास आठवले आणि राजू शेट्टींची जोडीच्या अभियनाची झलक मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही अभियन क्षेत्रातही दिसणार आहेत. या चित्रपटात दोघांची विशेष भूमिका पहायला मिळणार आहे.

‘राष्ट्र-एक रणभूमी’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी रिलीज होणार होता. परंतु करोनामुळे ते शक्य झालं नाही. अखेर दोन वर्षांनी या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे. प्रत्येक चित्रपटाची खासियत ह्ये त्यातले कलाकार असतात. या चित्रपटाचे वैशिष्ट्य काहीसे वेगळे आहे. या चित्रपटातील कलाकार महत्त्वाचे आणि दिग्गज आहेत शिवाय दोन मोठे राजकारणी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

(व्हिडिओ ट्रेलर सौजन्य – इंदर इटरनॅशनल)

आयपीआय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी या दोन दिग्गजांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.या चित्रपटात फक्त राजू शेट्टी आणि रामदास आठवले नाहीत तर नामवंत कलाकार आहेत. त्यात विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, संजय नार्वेकर, गणेश यादव, रीमा लागू सारख्या बड्या कलाकारांची मोठी फौज आहे.

भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ते राज्यसभेवर निवडून आले असून केंद्रात मंत्री आहेत. तसेच आज पर्यंत आठवलेंचे राजकीय करिअर पाहिल्यास त्यांची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे त्यांच्या शीघ्र कविता. त्यांच्या कवितांवरती तुम्ही अनेकदा फिदा झाला असाल. सध्या रामदास आठवले हे भाजपसोबत सत्तेत बसलेला असून त्या काँग्रेसवर वेळोवेळी तोफा डागत असतात तसेच आपल्या कवितांमधून विरोधकांना घायाळ करत असतात त्यांच्या कविता विरोधकांसाठी बोचरे बाण असतात.

राजू शेट्टी हे गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून लोकप्रिय आहेत. जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या राजू शेट्टी यांनी खासदारकीची निवडणूक जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पर्यंत अनेक शेतकरी आंदोलनात पाहिला असेल. रस्त्यावरचे आंदोलन ते संसदेपर्यंत असं राजू शेट्टींचं राजकीय करियर राहिलेलं आहे. ते अनेक अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात, मात्र राजू शेट्टी एका वेगळ्याच भूमिकेत दिसून येणार आहेत.

‘राष्ट्र-एक रणभूमी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. महामारीमुळे लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषय आता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेले हे 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

Politician Ramdas Athawale Raju Shetty in a Marathi Movie
Entertainment Politics Film Rashtra Ek Nirman Cinema

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोणती SUV कार बेस्ट? टाटा पंच की सिट्रॉन सी ३? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

Next Post

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या रांगेत उभे केल्याने सर्वत्र टीकेची झोड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FZjmbQ1VQAADhkq e1659935426673

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या रांगेत उभे केल्याने सर्वत्र टीकेची झोड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011