इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय बाजारात यंदा एकापेक्षा अधिक स्पोर्ट्स युटिलिटी वाहन बाजारात येण्यास तयार झाले आहेत. कॉम्पॅक्ट आणि छोट्या एसयूव्ही वाहनांची मागणी गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढली आहे. कमी किमतीत आणि चांगल्या युटिलिटीमुळे ग्राहकही वाहने अधिक पसंत करतात. त्यामुळे टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या लवकरच बाजारात मायक्रो एसयूव्ही प्रकारातील नवीन मॉडेल्स सादर करणार आहे.
एसयूव्ही वाहनांमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची किंमत सामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये असेल. एसयूव्हीची संकल्पना सर्वप्रथम ऑटो एक्सपोमध्ये सादर केली गेली होती. या दोन्ही मायक्रो एसयूव्ही वाहनांत सध्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन आणि आकर्षक कार लॉन्च होत आहे, त्यात टाटा कंपनीच्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जुलैच्या आधी भारतात सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारचा मान टाटा पंचजवळ होता. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपयांपेक्षाही कमी होती. परंतु जुलैमध्ये सिट्रोन सी 3 कार लाँच करण्यात आली आहे; ही देखील एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही कार आपआपल्या व्हेरिएंटमध्ये एकदम परफेक्ट आहेत. दोन्ही कारमध्ये आपली वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ज्या वेळी आपण एखादी बजेट एसयुव्ही घेण्याचा विचार करतो तेव्हा साहजिकच या दोन कारपैकी कोणती घ्यावी, असा प्रश्न निर्माण होत असतो. दोघांमधील फरक देखील जाणून घेणार आहोत.
टाटा पंचची किंमत 5.93 लाख रुपये आहे. सिट्रोन सी 3 ची किंमत 5.71 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सिट्रोन कारमध्ये 1198 सीसी इंजिन देण्यात आले असून, सिट्रोन सी 3 आणि टाटा पंच या दोन्ही कार्समध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. सिट्रोनचा दावा आहे, की सी 3 कार एक लिटरमध्ये 19.8 किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देऊ शकते. तर दुसरीकडे टाटा पंच 18.9 किलोमीटर प्रतिलीटरचा मायलेज देते.
सिट्रोन सी 3 ला दोन इंजिन पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. यामधील एक 1.2 लीटर नॅच्यूरल आस्पेरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 81 बीएचपीची पॉवर आणि 155 एनएमचा पीक टार्क जनरेट करु शकतो. या शिवाय दुसरे टर्बो पेट्रोल पर्याय देण्यात आला आहे. या इंजिन सेटअपध्ये 1.2 लीटर मिल जनरेटिंग 109 बीएचपीची पॉवर आणि 190 एनएमचा टार्क मिळणार आहे.
या कारमध्ये 10 इंचाचा टच स्क्रीन डिसप्ले देण्यात आला आहे. हा डिसप्ले इंफोटेनमेंट सिस्टमसह उपलब्ध होईल.यात वायरलेस अँड्रोईड ऑटो आणि ॲप्पल कार प्ले कनेक्टिव्हीटी उपलब्ध आहे. यात चार स्पीकरचा ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेंसर, एबीएससह ईबीडी सेंसर देण्यात आले आहे. टाटा पंच ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आहे. यात स्लीक आणि मॉडर्न डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. यात एक स्पिल्ट हेडलँप सेटअप देण्यात आला आहे. समोरच्या ग्रील आणि स्पोर्टी बंपर देण्यात आले आहे. यात एलईडी टेल लाइट्स आणि मशिन कट अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे.
SUV Car Tata Punch Citron C3 Whish is Best
Automobile Hyundai