इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची तब्ब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत रूग्णालयात आहे. पंतप्रधान मोदी देखील रूग्णालयात पोहोचले आहेत.
श्वसनाच्या त्रासामुळे हिराबेन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा डॉक्टारांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. हिराबेन यांनी गेल्या १८ जून रोजी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती.
हिराबेन यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रार्थना केली आहे की, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी. अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या होतील.”
https://twitter.com/RahulGandhi/status/1608033631364345856?s=20&t=SQhi0tOiQHxkpJq8rlN0JA
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यानी देखील ट्विट केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंची तब्येत खालावल्याची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत. मोदीजी यांच्या आईंची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1608036063192436736?s=20&t=SQhi0tOiQHxkpJq8rlN0JA
PM Narendra Modi Mother Admitted in Hospital
Gujrat Health Hiraben