पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद नाशिक व आरोग्य विभागाच्या पुढाकारातून ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या जागृत पालक, व सुदृढ बालक अभियान पिंपळगाव शहर व परिसरातील अंतर्गत गावातील अंगणवाडी,शाळा, महाविद्यालयात यशस्वीपणे राबवविण्याचे आवाहन पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचे सरपंच भास्कर बनकर यांनी केले.
पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जागृत पालक सुदृढ बालक अभियानाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश धनवटे होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामपालिका सदस्य केशव बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा पांडे, आरिफ काझी, डॉ.राहुल विधाते,आरोग्य सहायक शरद तिडके,नाना अंजिकर, दीपक परदेशी,आरोग्य सेवक दीपक चव्हाण,कनिष्ठ सहायक अनिल दवंगे, औषध निर्माण अधिकारी शिरीन मांडे, आदिंसह आरोग्य सेविका, आशा गतप्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
पुढे भास्कर बनकर म्हणाले, सदर अभियानाच्या माध्यमातून दिलेल्या कालावधीत १ ते १८ वयोगटातील बालकांची वाड्या वस्त्यांवर जाऊन, किंवा अंगणवाडी शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन संपूर्ण आरोग्य तपासणी करून, कुटुंबातील पालकांना याबाबत व्यवस्थित रित्या मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी देत महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी सदर अभियान घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्पर्श कृष्ठरोग जनजागृती…..
निफाड तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ३० जानेवारी पासून ते १३ फेब्रुवारीपर्यंत स्पर्श कृष्ठरोग जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. कृष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे आढळणार्यांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्षणांची तपासणी करून मोफत औषधोपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या टीमकडून करण्यात आले आहे.