India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हृदयद्रावक घटना! खदानीच्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; पिंपळनेर दुःखात बुडाले

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in क्राईम डायरी
0

अक्षय कोठावदे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इंदिरानगर परिसरातील तीन चिमुकल्यांचा शहरानजिकच्या खदानीच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण पिंपळनेर शहर हादरले आहे. मृत चिमुकल्यांची नावे नोयान मुक्तार शेख (१२ वर्ष), आयान शाह शफी शाह (११ वर्ष), हुजेफ हुसेन पिंजारी (१० वर्ष) अशी आहेत. नोयान आणि अयानचे वडील हे वाहन चालक आहेत. तर, हुजेफ याला वडिील नसून त्याची आई मोलमजुरी करते. त्यामुळे या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तिन्ही बालके पोहण्यासाठी गेले होते. ग्रामीण रुग्णालयात या तिन्ही बालकांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. तसेच, थोड्या वेळापूर्वी शोकाकुल वातावरणात अत्यसंकार करण्यात आला. घोड्यामाल इंदिरानगर येथील तीन बालके फिरण्यासाठी जेबापुर रस्त्यालगत असलेल्या डोंगराजवळ गेली. तेथील खदानीमुळे तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी डोंगराकडून वाहून येते. या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा साचला आहे. या ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पाच ते सहा बालक हे या पाण्याच्या खड्ड्याजवळ आले. त्यात तीन बालके नोयान मुक्तार शेख (१२ वर्ष), आयान शाह शफी शाह (११ वर्ष), हुजेफ हुसेन पिंजारी (१० वर्ष) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सदर बालके ही पोहण्यासाठी गेली होती. सुरुवातीला तीन बालके ही पाण्यात उतरली. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. या तिघांसोबत उपस्थित अन्य दोन ते तीन मुलांनी ही बाब बघून तातडीने घराकडे धाव घेतली. घरच्यांना ही माहिती दिल्यानंतर दुर्घटनास्थळी प्रशांत भटू पवार, गौतम पवार, मुशर्रफ शेख, राकेश पवार व बाबा फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते यांनी तातडीने धाव घेतली. या सर्वांनी तिन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू केला. अखेर सदर पाण्यातून तीन बालकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांना तत्काळ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉ. भामरे यांनी मृत घोषित केले. तिन्ही बालकांवर शवविच्छेदन होऊन रात्री या तिघा बालकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pimpalner Crime 3 Minor Children’s Drown in Canal Water Dhule District Sakri Taluka


Previous Post

चोरट्यांनी कांदा चाळीत केली चोरी; चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद ( व्हिडीओ )

Next Post

बँका आता घेणार हा मोठा निर्णय; ग्राहकांना होणार फायदाच फायदा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बँका आता घेणार हा मोठा निर्णय; ग्राहकांना होणार फायदाच फायदा

ताज्या बातम्या

धक्कादायक! भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने खेळविले कोरोनाबाधित खेळाडूला

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

१२ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या चिनी स्मार्टफोनवर भारतात बंदी?

August 9, 2022

या गावात नाही एकही मुस्लिम, तरीही साजरा होतो तब्बल ५ दिवस मोहरम

August 9, 2022

हवामान विभागाचा अंदाज का चुकतो? महासंचालक म्हणतात…

August 9, 2022

धक्कादायक! बुद्धिबळ स्पर्धेत रोबोटने ७ वर्षाच्या बालकाचे तोडले बोट (बघा व्हिडिओ)

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

मॉल किंवा शोरुममध्ये कागदी पिशवीसाठी पैसे मोजताय? आधी हा निकाल वाचा

August 9, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group