India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारताद्वारे ऑस्करसाठी एंट्री झालेला ‘छेल्लो शो’ हा चित्रपट आहे तरी कसा? (Video)

India Darpan by India Darpan
September 26, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – या सरत्या वर्षात विषयांचे वैविध्य जपणारे अनेक चित्रपट आले. आणि त्यांनी रसिकांच्या मनात स्थानही पटकावले. अशाच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना ऑस्करवारी करण्याची संधी मिळते. ऑस्करच्या याच शर्यतीत ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘आरआरआर’ अशा तगड्या चित्रपटांना मागे टाकत एका गुजराती चित्रपटाने ऑस्करमध्ये जाण्याचा बहुमान पटकावला आहे. ‘छेल्लो शो’ असं या गुजराती चित्रपटाचं नाव आहे.

चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती भाषिक चित्रपटाची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे आणि थेट ऑस्कर गाठण्यासारखे या चित्रपटाचे काय वेगळे वैशिष्ट्य आहे, याचीच माहिती आम्ही देणार आहोत.

‘छेल्लो शो ’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. आपल्याला जरी ऑस्करसाठी नामांकन झाल्यानंतर याची माहिती झाली असली तरी या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आणि रसिकांची वाहवा देखील मिळवली आहे.

‘छेल्लो शो’ याचा अर्थ शेवटचा शो असा आहे. चित्रपटात एका नऊ वर्षांच्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. हा मुलगा त्याच्या वडिलांना गुजरातमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यात मदत करतो. एके दिवशी त्याचे वडील त्याला कुटुंबासह एक चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातात आणि तिथून त्याला सिनेमाचं वेडच लागत. तो शाळेतून पळून जाऊन सिनेमा बघायला लागतो. यासाठी तो वडिलांचा मारही खातो.

सिनेमा बघण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नसतात तेव्हा तो चित्रपटगृहात प्रोजेक्टर चालवणाऱ्या माणसाशी मैत्री करतो. आईने बनवलेला शाळेचा टिफिन त्याला देऊन तो प्रोजेक्टर रूममधून रोज चित्रपट पाहतो. कालांतराने बऱ्याच गोष्टी बदलतात आणि प्रोजेक्टर असलेला हा सिनेमा हॉल बंद होतो. तेव्हा तो त्याच्या मित्रांबरोबर मिळून टाकाऊ वस्तूंपासून एक प्रोजेक्टर तयार करतो आणि थिएटरमध्ये पडलेल्या रील बॉक्सचा वापर करून चित्रपट पाहतो, अशी या चित्रपटाची साधारण रूपरेषा आहे.

‘ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवायचा याबाबत दीर्घ चर्चा झाली. एस. एस. राजमौलीचा ‘आरआरआर’, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आर. माधवन यांचे दिग्दर्शित आणि अभिनित ‘रॉकेट्री’ या चित्रपटांवर चर्चा झाल्यानंतर ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आल्याचे एफएफआयचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक पॅन नलिन हे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभाशाली नाव आहे. पॅन नलिन यांचे ‘संसारा’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ हे गाजलेले चित्रपट आहेत.

Oscar Film Chhello Show How Is It Video
Entertainment


Previous Post

स्पॅम कॉल्स आणि बनावट संदेशांना वैतागलात? लवकरच मिळणार हा मोठा दिलासा

Next Post

लंडनमध्ये प्राजक्ता माळीबरोबर असलेला फरहान आहे तरी कोण?

Next Post

लंडनमध्ये प्राजक्ता माळीबरोबर असलेला फरहान आहे तरी कोण?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group