इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या नैसर्गिक, निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरील ती सर्वाधिक सक्रिय अभिनेत्री आहे. शुटिंगनिमित्ताने सध्या ती लंडन दौऱ्यावर आहे. त्यामुळे ‘लंडनके फोटो तो बनते ही है ।’ आपल्या चाहत्यांना आपल्या नजरेतून लंडन दाखवण्याचा धडाका प्राजक्ताने लावला आहे. लाखो चाहते असल्याने तिची कोणतीही पोस्ट किंवा फोटोज क्षणात व्हायरल होतात. आणि तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरून कमेंटही करतात.
तर मुद्दा असा आहे की, एवढे छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या प्राजक्ताचे एवढे छान फोटो काढले तरी कोणी? शूटिंग संपल्यावर लंडनची भटकंती करतानाचे फोटो प्राजक्ता पोस्ट करते आहे. या फोटोंवर ‘क्लिक बाय माय ज्युनिअर फरहान’ असेही तिने म्हटले आहे. आता हा फरहान कोण, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आम्हालाही पडला होता. म्हणून आम्ही याची माहिती घेतली असता हा फरहान म्हणजे अभिनेता आलोक राजवाडे असल्याचे लक्षात आले.
होय, सध्या तो देखील प्राजक्तासोबत लंडनला शूटिंगसाठी गेला आहे. तोच प्राजक्ताचे सुंदर फोटो क्लिक करतो आहे. या सिनेमात प्राजक्ता आणि आलोकसह वैभव तत्त्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, हृषीकेश जोशी अशी तंगडी स्टारकास्ट आहे. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही त्याचे नाव गुलदस्त्यात आहे.
प्राजक्ता माळीच्या सौंदर्यासोबतच प्रेक्षक तिच्या अभिनयाचे देखील चाहते आहेत. अनेक मालिका, चित्रपटांमधून तिने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. नुकत्याच आलेल्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसला. तो काही चाहत्यांना रुचला नाही. आणि त्यावर ती बऱ्यापैकी ट्रोलही झाली होती.
London Prajakta Mali Photos Farhan