नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील म्हसरुळ भागातील टेक वस्तीत दुपारच्या सुमारास एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच धावपळ उडाली. तातडीने ही बाब पोलिस आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या दुर्घटनेत एकूण चार घरांचे नुकसान झाले आहे.
या आगीत संसारोपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. मात्र ही घरे काहीशा अडचणीच्या भागात असल्याने मदत कार्य करण्यास अडचण येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
Old Nashik Short Circuit Fire 4 Home Loss Video