लासलगाव – निफाड येथील लोकन्यायालयात आज न्यायप्रविष्ठ व वादपूर्व अशा नेमलेल्या एकुण ६२३८ प्रकरणांपैकी ४९७ प्रकरणे तडजोडीने मिटली आहे. त्यातुन ४ कोटी २ लाख ३२ हजार ५३५ रुपयांची वसुली झाली आहे
आज निफाड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते , सदर लोक न्यायालयात , निफाड तालुका विधी व सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश आर जी. वाघमारे, निफाडचे अति. सहा सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. जहागीरदार, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीमती वाय. डी. बोरावके, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, व स्तर एस. बी. काळे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, व स्तर एस. डब्ल्यु. उगले , निफाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. एन. गोसावी या सात न्यायाधीशांचे अध्यक्षतेखाली सात समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज पार पडले. या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ठ १११२ प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात आली. त्यापैकी ९३ प्रकरणात यशस्वी तडजोडी झाल्या त्यातुन २ कोटी ३८ लाख ७७ हजार ७०६ रुपयांची वसुली झाली तर न्यायालयात दाखल न झालेल्या अशा वादपुर्व ५१२६ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली होती त्यापैकी ४०४ प्रकरणे तडजोडीत मिटवली गेली. त्याप्रकरणातुन १ कोटी ६३ लाख ५४ हजार ८२९ रुपयांची वसुली झाली सदर लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वकील संघ निफाड, श्री. राहाणे, अधिक्षक जिल्हा व अति सत्र न्यायालय, निफाड , सौ. अपर्णा पाटील, व . लिपीक तसेच सर्व न्यायालयीन कर्मचा – यांनी प्रयत्न केले. अशा प्रकारे निफाडचे लोकन्यायालयात न्यायप्रविष्ठ व वादपुर्व अशा नेमलेल्या एकुण ६२३८ प्रकरणांपैकी ४९७ प्रकरणे तडजोडीने मिटली आहे. त्यातुन ४ कोटी २ लाख ३२ हजार ५३५ रुपयांची वसुली झाली आहे. लोकन्यायालयातुन सकारात्मक परिणाम झालेले दिसत आहेत.