मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया २०२२ सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदाच्या मानकरी

जून 13, 2022 | 5:41 pm
in स्थानिक बातम्या
0
NILAKSHI LOHE WINNER MRS WEST INDIA 2022 A scaled e1655122271411

नाशिक- ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२२ सीझन ४ या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘विनर मिसेस वेस्ट इंडिया २०२२ च्या सिल्व्हर कॅटॅगरीचे विजेतेपद नाशिकच्या नीलाक्षी लोही ह्या सौंदर्यवतीने पटकविले आहे. तसेच सौंदर्य व बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या नीलाक्षीने याच स्पर्धेत ‘मिसेस कॉन्फिडंट २०२२ – सिल्व्हर कॅटॅगरी’ बहुमानाचा मुकूटही पटकवला आहे पुण्यातील हॉटेल हयात येथे झालेल्या या सौंदर्यस्पर्धेत नीलाक्षी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘दिवा पेजंट्स ही संस्था विवाहित महिलांसाठी त्यांच्या गुणसामर्थ्याचा आविष्कार घडवण्याचा आणि इतरांना अशक्य वाटणारे साध्य करण्याचा सुप्रतिष्ठित व सुरक्षित मंच उपलब्ध करून देते .ठरवून गृहिणीपद पत्करलेल्या आणि वन्यजीवन छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या नीलाक्षी ह्यांना प्रतिष्ठेच्या सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचे धाडस करणे तितकेसे सोपे नव्हते. नीलाक्षी ह्यांना स्वयंपाक व बेकरी उत्पादने बनवण्याखेरीज व्हायोलिन वाजवण्याचा आणि वन्यजीवन छायाचित्रणाचाही छंद आहे. जगातील प्रत्येकाला समजणारी वैश्विक भाषा असलेल्या छायाचित्रणावर नीलाक्षी उत्कटतेने प्रेम करतात वास्तविक छायाचित्रणाच्याच या आकांक्षेनेच नीलाक्षी ह्यांना तंदुरुस्तीप्रेमी बनवले आहे. नीलाक्षी यांनी नियमित व्यायामाने २० किलो वजनही कमी केले आहे .

आपल्या अनुभवाबद्दल नीलाक्षी लोही म्हणाल्या की ‘स्काय इज द लिमिट’ पण मी माझे पाऊल चंद्रावर रोवले आणि ताऱ्यांमध्ये माझे स्थान निर्माण केले तर तेच आकाश माझ्यासाठी मर्यादा न ठरता प्रारंभ असेल. माझा खरोखर विश्वास आहे, की आम्ही स्त्रिया म्हणून जे काही साध्य करु शकतो त्याला मर्यादा नाही. माझी सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे समूहासमोर मंचावर जाण्याच्या भीतीवर केलेली मात होती. इतक्या प्रचंड संख्येच्या जनसमुदायापुढे बोलण्याची मला भीती वाटत होती आणि मला ते आव्हान पेलायचेही होते.

त्या पुढे म्हणाल्या “या प्रतिष्ठित मंचावर माझे नाव विजेतेपदासाठी जाहीर केले गेले तो क्षण खरोखर भारावून टाकणारा होता. ही स्पर्धा संपूर्ण समर्पित भावनेने लढवण्याचे धैर्य माझ्यात होते आणि मी उदार अंतःकरणाने, निर्भय मनाने आणि धाडसी भावनेने माझ्यातील गुणांचा आविष्कार घडवला त्यामुळेच मी हा बहुमान जिंकण्यास लायक ठरले. मी माझ्यासाठी भक्कम शक्तिस्तंभ असलेले माझे पती श्याम लोही यांनाही धन्यवाद देते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी या सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचे धाडस करु शकले. ‘दिवा पेजंट्स’ची संकल्पना साकारणारे आणि स्पर्धेसाठी माझी तयारी करुन घेणारे अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्याबाबतही मी अत्यंत कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले, मी ही कामगिरी करु शकते, असा विश्वास दिला आणि काहीही झाले तरी स्वप्नांचा पाठपुरावा कसा करायचा याचा मार्गही दाखवला. त्यांचे खूप आभार. त्यांनी केलेले समर्पित मार्गदर्शन व अचूक जडण-घडण यामुळे खरोखर प्रत्येक स्पर्धकाचे विजेत्यात रुपांतर झाले.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अदानींच्या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दबाव टाकला? खरं काय आहे?

Next Post

नाशिकमधून तब्बल २६ देशामध्ये सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणा-या उद्योजकाची विशेष मुलाखत (बघा व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20220612 WA0127

नाशिकमधून तब्बल २६ देशामध्ये सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणा-या उद्योजकाची विशेष मुलाखत (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011