India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकमधून तब्बल २६ देशामध्ये सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणा-या उद्योजकाची विशेष मुलाखत (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
June 13, 2022
in भेट थेट
0

 

सोनल गावकर-गीते, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आखाती देशात सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंना जास्त मागणी असेल असे आपल्याला वाटते. पण, भारतातून सर्वाधिक सौंदर्य प्रसाधनाची निर्यात युएसएला होत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयातंर्गत असलेल्या केमेक्सिल या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सौंदर्य प्रसाधन मंडळाचे अध्यक्ष डॅा. उद्य खरोटे यांनी दिली. ते म्हणाले की, मी स्वत; २६ देशांना सौंदर्य प्रसाधनाची निर्यात माझ्या कंपनीतून करतो.

इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये डॅा. खरोटे यांची गौतम संचेती यांनी मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी केमेक्सिल या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या समितीची माहिती देतांना सांगितले की, सौदर्य प्रसाधन, साबण, सुगंधी तेल आदी उत्पादनांच्या निर्यात वृद्दीसाठी उद्योगाना उपाययोजना करणे व त्यांच्या निर्यातमध्ये येणाऱ्या समस्याचे निराकरण करणे कामी केमेक्सिलची काम करते. केमेक्सिलचे अखिल भारतीय कार्यालय मुंबईत असून अहमदाबाद, बंगलोर, कलकत्ता, नवी दिल्ली असे चार विभागीय कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षापासून मी या समितीच्या अध्यक्षपदासाठी काम करतो. नाशिकच्या उद्योजकाला पहिल्यांदा ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे. या संस्थेत ३५०० हजार सभासद देशभर आहे. निर्यातदारांना प्रोत्साहन देणे, निर्यात कशी करावी त्याचे प्रशिक्षण देणे, त्यांच्या मालाला मार्केट देणे निर्यातदारांना विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल्स सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे ही कामे ही संस्था करते.

सौंदर्य प्रसाधनाच्या उद्योगाकडे कसे आला याबाबत बोलतांना ते म्हणाले की, १९९४ ला नाशिक मध्ये फार्मा कंपनीमध्ये मी कामगार कायदा सल्लागार होतो. येथे छोटेसे सौंदर्य प्रसाधने निर्माण करण्याचे काम मला मिळाले. त्यानंतर मी हळूहळू त्यात वाढ करत हा उद्योग वाढवला. आज माझ्या इंस्टो कॉस्मेटिक्स प्रा.ली कंपनीतून सव्वीस देशांमध्ये सौंदर्यप्रसाधने निर्यात होते. त्यात रशिया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड नंतर आखाती सर्व देश यांचा समावेश आहे.

यावेळी त्यांनी विविध संस्थेमध्ये काम करत असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, विविध संस्थेमध्ये पदे मिळाली. तेथे मी कामे केली. निपमचे अध्यक्षपद भूषविले आहे. निमा मध्ये वीस ते पंचवीस वर्षांपासून काम करतो आहे. नाशिक मध्ये मेक इन नाशिक ही संकल्पना राबवली. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर व्यवस्थापक शास्त्र रिसोर्स पर्सन म्हणून नियुक्ती झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नाशिक मध्ये गेल्या वीस वर्षांपासून मोठे उद्योग आले नाही. उद्योग न येण्याचे एकमेव कारण म्हणजे राजकीय नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तरुणांनाही मार्गदर्शन केले.
बघा ही संपूर्ण मुलाखत


Previous Post

नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया २०२२ सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदाच्या मानकरी

Next Post

७१ वर्षे वयाच्या जेष्ठ डॉक्टरांना वोक्हार्ड हॉस्पिटलने दिली नवसंजीवनी

Next Post

७१ वर्षे वयाच्या जेष्ठ डॉक्टरांना वोक्हार्ड हॉस्पिटलने दिली नवसंजीवनी

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group