लेफ्ट बंडल पेसींग बसवुन उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एका ज्येष्ठ डॉक्टरांच्या हृदयात लेफ्ट बंडल पेसींग बसवून त्यांचे हृदय पुनश्च धडधाकट करुन देण्याचा प्रयत्न नाशिकच्या वोक्हार्ड हॉस्पीटलमधील डॉ. प्रशांत पवार यानी करुन वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी, सर्वसाधारणतः रुग्णांच्या / लोकांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती म्हणजेच वैद्यकीय भाषेत पल्स रेट कमी – जास्त असलेल्या रुग्णांसाठी पेसमेकर वापरले जाते. साधारण स्वरूपाचे पेसमेकर नाशिक मध्ये उपलब्ध होते. परंतु लेफ्ट बंडल पेसींग उत्तर महाराष्ट्रात सहसा कोणी पाहीले नव्हते. गेल्या आठवड्यात एका ज्येष्ट डॉक्टरांचे हृदयाचे ठोके अनीयमीत होऊ लागले. मिनटाला साठ पेक्षा कमी ठोके पडू लागले (पल्स रेट कमी असल्यामुळे) त्यांना दम लागणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे असा त्रास जाणवत होता. त्यामुळे ते वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. डॉ. प्रशांत पवार यांनी त्यांना तापसल्या नंतर हृदयचे ठोके कमालीचे कमी होत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना त्यांच हदय पुनश्च पूर्वी प्रमाणे कार्यान्वीत होण्यासाठी लेप्ट बंडल पेसींग बसवीण्याचा निर्णय घेतला. या पेसमेकरमुळे साधारण (नॉर्मल) फिजीयोलॉजिकल पेसींंग नैसर्गिक हृदयाची क्रिया सक्रिय पद्धतीने केली. त्यांना पुनश्च ताजे तवाने वाटु लागले आहे. त्यांचे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. इतर साधारण ( नॉर्मल ) पेसमेकर मध्ये नॉर्मल फिजीयोलॉजिकल पेसींग सक्रिय केले जात नाही. अशा परिस्थितीत लोकांना दम लागणे, हार्ट फेल होणे या गोष्टींची भविष्यात संभावना असते. अशा प्रकारच्या रुग्णाला या पेसमेकरचा वापर करून धोका कमी करून टाळता येऊ शकतो. हे पेसमेकर आधुनिक स्वरूपाचे असून यात एमआरआय देखील केले जाऊ शकते. असे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.