India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

किरीट सोमय्यांच्या मुलाने अवघ्या १४ महिन्यात मिळवली पीएचडी; राज्यात सर्वत्र जोरदार चर्चा

India Darpan by India Darpan
October 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध प्रकारच्या गैरकाराभारांवर सातत्याने पत्रकार परिषद घेणारे आणि गौप्यस्फोटाद्वारे चर्चा घडवून आणणारे भाजप नेते  किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या याच्या पीएचडीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पदवीदान समारंभाचे काही फोटो नील सोमय्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून शेअर केले आहेत. अवघ्या १४ महिन्यांत पदवी मिळवल्याचा आरोप आता त्यांच्यावर केला जात आहे.

फाईल्स आणि कागदपत्र दाखवून दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पीएचडीची पदवी वादात आली आहे. सोशल मीडियातील व्हायरल दाव्यानुसार, किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अवघ्या १४ महिन्यांत पदवी मिळविली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पदवीनुसार, नील सोमय्या यांनी फक्त १४ महिन्यांत पीएचडी मिळविली. व्हायरल कागदपत्रांमुळे नील सोमय्यानी ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला. त्यानंतर दीड महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये तोंडी परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली. ज्या वेगाने पीएचडी झाली, ज्या वेगाने मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात आली त्या वेगावर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत. या संदर्भात दोन्ही बाजूने दोन कागदपत्र समोर आली आहेत. पदवीदान समारंभाचे काही फोटो नील सोमय्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून शेअर केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.

नील सोमय्याचे स्पष्टीकरण
१७ सप्टेंबर २०१६ रोजी नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. दुसरा कागद नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे. यात पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून २०२१ ची आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र, सारं काही नियमात केल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांनीही सोमय्याच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केले आहे. १४ महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडीसाठी ७२ महिने लागल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

Neil Kirit Somaiya PhD Mumbai University 14 Months
Politics Education Critic


Previous Post

जागा शिवसेनेची मग भाजपचा उमेदवार का? ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’ने उमेदवार का नाही दिला? यापुढेही शिंदे गटाचे असेच होणार?

Next Post

नशिबवान भाजप खासदार! एकाचवेळी दोन्ही पत्नींसोबत साजरा केला करवा चौथचा सण

Next Post

नशिबवान भाजप खासदार! एकाचवेळी दोन्ही पत्नींसोबत साजरा केला करवा चौथचा सण

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group