नवरात्रामध्ये राशीरत्न घ्यायचंय? आधी हे जाणून घ्या…
नवरात्री निमित्त अनेक वाचकांनी रत्न धारण करण्याबद्दलचे प्रश्न विचारले आहेत. त्याबाबत वाचकांच्या माहिती करता राशी रत्न धारण करणेबद्दल प्राथमिक माहिती देत आहे. स्वतःकरता रत्न वापरण्याबाबत सविस्तर माहितीसाठी व्यक्तिगत कुंडलीवर हस्तरेषा पाहून मार्गदर्शन केले जाईल. कोणते रत्न कोणी कोणत्या प्रसंगी वापरावे याची प्राथमिक माहिती पुढील प्रमाणे

व्हॉटसअॅप – 9373913484
पोवळे Coral (मंगळाचे रत्न)
मेष रास, अश्विनी भरणी किंवा कृतिका नक्षत्र असल्यास त्याचप्रमाणे वृश्चिक रास, विशाखा, अनुराधा किंवा जेष्ठा नक्षत्र असल्यास किंवा कुंडलीत मेष अथवा वृश्चिक लग्न असल्यास अथवा कुंडलीत कोणत्या प्रकारचा मंगळ दोष असल्यास पोवळे रत्न वापरतात.
माणिक Ruby (रवी चे रत्न)
सिंह रास, मघा पूर्वा किंवा उत्तरा नक्षत्र असल्यास त्याचप्रमाणे कुंडलीत सिंह लग्न असल्यास तसेच कुंडलीतील रवी षष्ठम अष्टम अथवा द्वादश भावात असल्यास माणिक वापरतात.
मोती Pearl (चंद्राचे रत्न)
कर्क रास, पुनर्वसु पुष्य किंवा अस्लेशा नक्षत्र असल्यास त्याचप्रमाणे कर्क लग्न असल्यास तसेच कुंडलीतील चंद्र राहू किंवा केतू शनि अथवा मंगळ युतीत असल्यास किंवा कुंडलीतील चंद्र षष्ठ अष्टम अथवा द्वादश भावात असल्यास मोती वापरतात.
पाचू Emrald (बुध ग्रहाचे रत्न)
कन्या रास, उत्तरा हस्त किंवा चित्रा नक्षत्र त्याचप्रमाणे मिथुन रास, मृग आर्द्रा किंवा पुनर्वसु नक्षत्र, त्याचप्रमाणे कुंडलीत बुध लग्न असल्यास, कुंडलीतील बुध, शनि, राहु, केतु, युतीमध्ये असल्यास, कुंडलीतील बुध, षष्ठ, अष्टम व द्वादश भावात असल्यास पाचू वापरतात.
पुष्कराज Yellow Sapphire (गुरुचे रत्न)
धनु रास, मूळ पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र, त्याचप्रमाणे मीन रास, पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा किंवा रेवती नक्षत्र त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये धनु किंवा मीन लग्न असल्यास किंवा कुंडलीतील गुरु, राहू-केतू शनि अथवा मंगळ युती मध्ये असल्यास, किंवा गुरु, षष्ठ, अष्टम अथवा द्वादश भावात असल्यास पुष्कराज वापरतात. सहज फॅशन म्हणून पुष्कराज वापरू नये
हिरा Diamond (शुक्राचे रत्न)
वृषभ रास, कृतिका रोहिणी अथवा मृग नक्षत्र त्याचप्रमाणे तूळ रास, चित्रा स्वाती अथवा विशाखा नक्षत्र त्याचप्रमाणे कुंडलीत वृषभ अथवा तूळ लग्न किंवा कुंडलीतील शुक्र, राहू, केतू, शनी युतीमध्ये असणे किंवा शुक्र ग्रह षष्ठ अष्टम किंवा द्वादश भावामध्ये असणे अशावेळी हिरा वापरतात.
नीलम Blue Sapphire (शनीचे रत्न)
मकर रास, उत्तराषाढा श्रवण किंवा धनिष्ठा नक्षत्र त्याचप्रमाणे कुंभ रास, धनिष्ठा शततारका किंवा पूर्वा भाद्रपदा नक्षत्र तेव्हा कुंडलीत शनि लग्न असणे किंवा साडेसाती सुरू असणे, त्यातल्या त्यात साडेसातीची मधली अडीच की सुरू असणे, शनि पंचम सप्तम अथवा नवम भावात असणे, अशावेळी नीलम वापरतात.
गोमेद/ लसण्या (राहू-केतू चे रत्न)
ही रत्ने कोणत्या राशीशी संबंधित नाही. राहू अथवा केतू लग्नाची कुंडली असेल त्याचप्रमाणे राहू पंचम, सप्तम, नवम अथवा द्वादश भावात असेल, किंवा कोणताही शुभ ग्रह राहू, केतू युतीमध्ये असल्यास गोमेद/ लसण्या वापरतात..
रत्न वापरण्याबाबत वरील अतिशय प्राथमिक माहिती आहे. सर्वच रत्नांचे विविध प्रकार आहेत. उपरत्ने भरपूर आहेत त्यामुळे रत्नांचे माईन्स देश क्वॉलिटी, प्युरिटी तसेच कोणत्या धातूमध्ये वापरणे, कोणत्या बोटात वापरणे, किती दिवस वापरणे, अंगठी अथवा पेंडंट वापरणे, याबाबत प्रत्यक्ष रत्न वापरताना तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत.