सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
श्रावणमासातील अखेरची अमावस्या आणि ती ही शनिवारी समाप्त होत असल्याने शनी अमावस्या निमित्ताने आज भाविकांनी नस्तनपूर येथे शनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनी देवाचे मंदिर शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दूरवरून भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते. जागृत देवस्थान असल्याने येथे शनीची साडेसाती असणारे भाविक या ठिकाणी अभिषेक, महापूजा करीत असतात तर दाल बट्टीचा महाप्रसाद येथे या निमित्ताने होत असतो.