सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सध्या अवैधरित्या हातभट्टी दारू बनवली जात आहे. नदीकिनारी वाढलेले मोठे गवत, झाडी यांचा आधार घेत दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी अवैध रित्या सुरू असलेल्या हातभट्टी वर छापे मारत तेथील अड्डे उद्ध्वस्त केले.