India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली महिलेवर सामुहिक बलात्कार; सिन्नरमधील धक्कादायक प्रकार

India Darpan by India Darpan
February 6, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे महिलेवर सामुहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ख्रिश्चन मिशनरी याने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी त्याच्या चार साथीदारांसह झोपडपट्ट्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करीत असे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे या आरोपींकडून दाखवण्यात येत होती, आरोपही येशूच्या नावाने बरे होतात, असा खोटा प्रचारही करण्यात येत होता. येशूची प्रार्थना केल्यानं आर्थिक आणि आरोग्य समस्या दूर होतात, त्यामुळे येशूची पूजा करा, असं या आरोपींकडून सांगण्यात येत असे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासही लोकांना सांगण्यात येत असे.

याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर येथील दावत मळा माळेगाव येथे संबंधित फिर्यादी महिला आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून भागवते. पीडित महिला मुसळगाव एमआयडीसीमध्ये काम शोधण्यासाठी घरून निघाली, दुपारचे सुमारास दाबी देस सिन्नर येथे आल्यानंतर रिक्षाची वाट पाहत थांबले होती. त्याचवेळी तेथे दोन महिला भेटल्या. त्या पीडित महिलेस म्हणाल्या की, तू आमचे सोबत चल आम्ही तुला काम देतो, त्यानंतर परी हनुमान मंदीर, जोशीवाडी सिन्नर येथे पायी त्याचे सोबत घेउन गेल्या. घरी पोहचल्यानंतर त्यांनी त्यांची नावे बुटटी व प्रेरणा अशी असल्याचे सांगितले. घरात भाउसाहेब उर्फ भावड्या दोडके हा देखिल होता. त्यांनी पिडीतेस तिचा विषयीची माहिती विचारली. त्या म्हणाल्या की बाई तुझी तब्बेत बरी राहत नाही तर तुला आम्ही सांगतो ते कर. ‘तू येशूची प्रार्थना कर’ तुला बरेपण वाटेल, तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यानंतर त्यांनी सांयकाळी घरी राहुल फादर यांना बोलावून घेतले. राहुल फादर आल्यावर त्यांनी पीडित महिलेस लाल रंगाचे पाणी पाजले. एक येशूचे चित्र असलेले पुस्तक दाखविले. त्यानंतर पीडित महिलेला थोडे गुंगी आल्या सारखे वाटल्याने पीडित तेथेच त्यांचे घरी झोपिवले. त्या रात्री फादर सह इतर ४ जणांनी दमदाटी करून आळीपाळीने पीडितेवर बळजबरीने बलात्कार केला. यासंदर्भात सिन्नर पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध कारवाही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nashik Sinner Crime Rape Religious Conversion FIR


Previous Post

दोन महिन्यात तलाक… नंतर पतीचा पोटगी देण्यास नकार… उच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन सख्या भावांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन सख्या भावांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group