India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडच्या प्रस्तावाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे नाशिक महापालिकेला निर्देश

India Darpan by India Darpan
January 6, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिंहस्थ आता अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपला आहे. गेल्या सात – आठ वर्षांमध्ये शहराची व्याप्ती खूपच वाढली असून लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिंहस्थच्या काळात अवघ्या देशभरातील भाविक नाशिकला येत असल्याने वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी सिंहस्थ उत्सवाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची कामे लवकरात लवकर सुरू करावी तसेच शहराच्या बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडच्या प्रस्तावास लगेचच गती देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने महिन्याभरापूर्वी शहरातील विविध समस्या आणि लोकाभिमुख विकासकामांसाठी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात मनपाच्या विविध अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. यात अनेक विकास कामांचा समावेश होता. या बैठकीचे इतिवृत्त आज प्राप्त झाले असून शहरातील अनेक विकास कामांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत. शहरवासीयांसाठी महत्वाच्या असलेल्या विकासकामांविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालय प्रशासन स्तरांवरही कामांची वर्गवारी केली आहे. सिंहस्थ उत्सवात वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी शहराच्या बाह्य आणि अंतर्गत रिंगरोड तयार करण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिंहस्थ उत्सवाच्या अनुषंगाने नाशिक मनपा प्रशासनाने तातडीने पुर्वतयारी सुरू करावी तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करताना मोबदला देण्याच्या अनुषंगाने टीडीआरचा प्रस्ताव तपासून घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली आहे.

याबरोबरच मनपाच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिळकतींना नाममात्र भाडे आकारण्यात यावेत, बांधकाम परवानगी प्रक्रिया ऑफलाइनच असावी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, ग्रीन फिल्ड प्रकल्प रद्द करून त्याऐवजी अनुषंगिक विकास कामे करावीत, सिडकोतील इमारती फ्री व्होल्ड कराव्यात, ठाणे शहराप्रमाणे नाशिकच्या रि डेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी ओव्हर आणि अब्हाऊ एफएसआय मिळावा, बारा मीटर प्रमाणे नऊ मीटर रस्त्यांलगतच्या इमारतींना उंचीचा लाभ मिळावा, मनपा हद्दीलगतच्या नासिक प्राधिकरण अंतर्गत असलेल्या गावांना मनपा प्रशासनाने मुलभूत सुविधा पुरवाव्यात, नाशिक प्राधिकरणाच्या समितीच्या सदस्यांचे शासनामार्फत नामनिर्देशन करण्यात यावे, दारणातील पाणी नाशिकरोड येथील जलकुंभात टाकण्यासाठी थेट पाईपलाईनच्या प्रस्तावास आणि शहरातील भुयारी गटार योजनांच्या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळावी, किकवी धरणासाठी निधीची तरतूद करावी, नदी संवर्धन, मेट्रो, नासडीचे पुनर्जीवन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या विषयांना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असून सदर प्रस्तावांना लगेचच गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आणि मंत्रालय प्रशासनाला दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

Nashik Ring Road Proposal CM Shinde Directions
Simhastha Kumbhamela


Previous Post

हेडफोन बेतले जीवावर; रेल्वे रुळ ओलांडतांना अकरावीत शिकणा-या विद्यार्थीनीचा मृत्यू

Next Post

हा पठ्ठ्या पत्र्याचं शेड भाड्यानं घ्यायचा.. आणि कमावले तब्बल ४०० कोटी… कसं काय? बघा, तुम्हीच

Next Post
प्रातिनिधिक फोटो

हा पठ्ठ्या पत्र्याचं शेड भाड्यानं घ्यायचा.. आणि कमावले तब्बल ४०० कोटी... कसं काय? बघा, तुम्हीच

ताज्या बातम्या

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group