खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना सेवा न देण्याचा निर्णय घेणाऱ्या हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासमवेत आज बैठक झाली. खासगी हॉस्पिटल्सला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. तसेच, सरकारच्या नियमांनुसार सेवा द्यावी लागेल, असे आयुक्तांनी बजावले आहे. त्यानंतर कोरोना सेवा नियमित ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
हॉस्पिटल ओनर असोसिएशन, नाशिक यांनी कोरोना रुग्ण सेवेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने या असोसिएशनला आयुक्तांनी चर्चेसाठी बोलविले होते. त्याबैठकीत आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले की, आपण सामंजस्याची भूमिका ठेवून रुग्णांना उत्तम सेवा द्यावी तसेच त्यांना असणाऱ्या विधायक समस्या प्रशासनाकडून सोडवल्या जातील, अशी ग्वाही दिली.
मोठ्या रुग्णालयाने ऑक्सिजन प्लांट उभारणी करणे, ऑक्सिजन वाहतुकीचे दर असे विविध मुद्दे यावर आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. तसेच त्यांना कामात येणाऱ्या अडचणी यावेळी सांगितल्या. आयुक्तांनी सांगितले की आपल्याकडून सामंजस्याची भूमिका ठेवा रुग्णांना सेवा द्या. आपल्यावर अन्याय झाल्यास त्यावेळी प्रशासन आपल्या बरोबर राहील. मात्र आपण शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. आपल्याला विधायक समस्या असतील त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यात येतील, असे आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले. दरम्यान, शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे,हॉस्पिटल ओनर असोसिएशन नाशिकचे डॉ. राज नगरकर डॉ. समीर आहेर,डॉ.श्याम पाटील डॉ.सुनील जगताप डॉ.अमोल वाजे डॉ.देवेंद्र येवला डॉ.जगदीप राजेबहाद्दर डॉ.मुकेश अग्रवाल डॉ.शोधन गोंदकर डॉ.मयूर सरोदे डॉ.अजित बोरस्ते डॉ.राहुल शिंदे डॉ.शरद देशमुख डॉ.सागर केळकर डॉ.पंकज देवरे डॉ.देवेंद्र खैरनार डॉ.सचिन देवरे आदी उपस्थित होते.