दिंडोरी : न्यायालयात कामकाज करणाऱ्या वकील व टायपिस्ट आदी सर्वांच्या कुटुंबियांसाठी कोविड लसीकरणासाठी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी दिंडोरी – सुरगाणा तालुका बार असोसिएशनने जिल्हाधिकारी ,दिंडोरी उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिंडोरी वकील संघातर्फे दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर यांना निवेदन दिले. कोविडच्या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागत असून न्यायालयात कामकाज करणारे अधिकारी कर्मचारी वकील व तेथे काम करणारे टायपिस्ट व इतर कर्मचारी यांनाही त्याची झळ बसली आहे. सर्व घटक न्यायदानासाठी आपले काम करत करत आहे.कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे असून त्यासाठी न्यायालयीन कामकाज करणारे वकील,टायपिस्ट व इतर सर्व घटकांचे त्यांचे कुटुंबियांचे लसीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे .तरी सदर घटकांना लसीकरण करण्यासाठी लसींची उपलब्धता करून देत शिबिराचे आयोजन करण्याची मागणी वकील संघाने जिल्हाधिकारी, दिंडोरी उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे या वेळी दिंडोरी वकील संघ अध्यक्ष ॲड शांताराम उगले, उपाध्यक्ष ॲड प्रदीप घोरपडे, सेक्रेटरी ॲड शिवाजीराव गायकवाड,ॲड शशिकांत क्षिरसागर,ॲड जगदीश घुमरे आदी वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.