India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जिंदाल कंपनी अग्नितांडव अपडेट ४ – मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली, अभूतपूर्व वाहतूक कोंडी

India Darpan by India Darpan
January 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुःखद बातमी आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट नेमका कुठल्या विभागात आणि कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा स्फोट बॉयलरचा असल्याचे सांगितले जाते. स्फोटानंतर कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. आग आणि प्रचंड धुराचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत. जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसेच, परिस्थितीचे गांभिर्य पाहून कंपनीच्या परिघातील ३ किमीचा परिसर निर्मनुष्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, आता मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

कंपनीमध्ये एक हजाराहून अधिक कामगार काम करतात. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट कंपनीत झाला. स्फोटानंतर भीषण अग्नीतांडव सुरू झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिस आणि अग्निशमन यंत्रणेला फोन गेल्यानंतर अनेक अग्निशमन बंब आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासह आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आग आणि धुराची स्थिती पाहता बराच वेळ नियंत्रण मिळविण्यात जाणार असल्याचे दिसून येते.

कंपनीतील आगीची भीषणता अतिशय मोठी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स कंपनीच्या आवारात मागविण्यात आले आहेत. तसेच, कंपनीच्या परिसरातील तब्बल ३ किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतले आहे.जिल्हाधिकारी गंगाधरन,  पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पाहणी दौरा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिशय युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे. मात्र, त्यास फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे. अग्नितांडव अद्यापही शमत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंपनी लगतच्या महामार्गावरील वाहतुकीचा विचार करता प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– इगतपुरीतील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट..
– स्फोटांमुळे आजूबाजूच्या गावांना हादरा ..
– स्फोटात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती..#Igatpuri #blast pic.twitter.com/q0HzErkv50

— poonamkawar19 (@poonamkawar19) January 1, 2023

Major Blast and Fire in Jindal Company Today
Igatpuri Vadivarhe Smog Industry
Nashik Jindal Company Fire Accident Update 4


Previous Post

जिंदाल आग्नितांडव अपडेट 3 – बचाव कार्यासाठी थेट लष्कराला पाचारण

Next Post

जिंदाल अग्नितांडव अपडेट ५ – मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे

Next Post

जिंदाल अग्नितांडव अपडेट ५ - मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group