नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीत भीषण अग्नितांडव सुरू आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठ्या स्फोटाद्वारे लागलेल्या आगीचे रौद्ररुप अद्यापही कायम आहे. जिल्हाभरातील अग्निशमन बंब येथे दाखल झाले असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आता थेट लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कराची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिंदाल कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. या गंभीर अपघाताची दखल घेत पोलिस, आरोग्य आणि विविध विभागांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोठा फौजफाटा तेथे आहे. मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. तब्बल ५ तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळविता येत नाही. आग आणि धुराच्या लोटाने परिसरात खळबळ उडाली आहे. आता थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या कारखान्यात पॉलिफिल्मची निर्मिती केली जाते. येथे अनेक रसायने असतात. त्यामुळेच आग आणखीन तीव्र होत आहे.
Nashik Jindal Company Fire Accident News Update 3