नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीमध्ये भीषण स्फोटानंतर मोठे अग्नितांडव सुरू आहे. गेल्या सहा तासांपासून आगीचे लोट सुरूच आहेत. तर, ही भीषण आग कंपनीच्या विविध विभागांना कवेत घेत आहे. या आगीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत २ जण ठार तर २० जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींवर नाशिकच्या सुयश आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगिचले जाते. या मोठ्या दुर्घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा अतिशय सतर्क झाली आहे. त्यामुळेच एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा आपत्ती मदत व बचाव पथक तसेच लष्कराची तुकडी घटनास्थळी कार्यरत झाली आहे.
नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये १४ जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. तर, नाशिकच्या आयसीयू ट्रॉमा सेंटरंमध्ये चार जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. यातील दोन जखमी महिलांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिमा (वय २०) आणि अंजली (वय २७) असे मृत महिलांची नावे आहेत. या दोन्ही कंपनीच्या कर्मचारी आहेत.
कंपनीत दोन हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. अग्नितांडव अतिशय भीषण आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाधरण, पोलिस अधिक्षक शहाजी उमप, प्रांताधिकारी, तहसिलदार अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठी फोज तेथे दाखल आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्य़मंत्री डॉ. भारती पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन माहिती दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दुर्घटनाग्रस्त जिंदाल कंपनीची पाहणी; पत्रकारांशी संवाद https://t.co/kkxX8vBKrr
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 1, 2023
Nashik Jindal Company Fire Accident Update 5
Death Injured