India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकातील गोळीबार प्रकरणः शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पुत्रावर अखेर गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील देवळाली भागात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काल रात्री तुफान राडा झाला. यावेळी हवेत गोळीबारही झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. आता याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गोळीबार प्रकरणी संशयित स्वप्नील लवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील हा माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे.

सूर्यकांत लवटे यांनी गेल्या महिन्यात शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. शिवजन्मोत्सवासंदर्भात देवळाली येथए काल बैठक होती. या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. अखेर याचे पर्यवसन तणावातही झाले. याचवेळी स्वप्निल लवटे याने हवेत गोळीबार केला. याची तत्काळ दखल घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दंगलविरोधी पथकही तेथे तौनात करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. याप्रकारामुळे नाशकात शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता हिंसक झाला आहे. हा वाद पुढे वाढू नये आणि शहराच्या अन्य भागात त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस कसून तपास करीत आहेत. स्वप्निल लवटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nashik Deolali Firing Case FIR Lodged Political
Swapnil Suryakant Lavate


Previous Post

भावा, तुझा विश्वास बसणार नाही! चक्क १८ लाखांचा चकाचक डांबरी रस्ता झाला गायब; कुठे? कसा? आणि कधी?

Next Post

तयार रहा! ‘त्या’ ३,५०० पदांवर येत्या २ महिन्यात होणार भरती; राज्य सरकारची तयारी

Next Post

तयार रहा! ‘त्या’ ३,५०० पदांवर येत्या २ महिन्यात होणार भरती; राज्य सरकारची तयारी

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group