नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर ची आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने संरक्षण मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन चे जॉईंट सेक्रेटरी श्री अनुराग बाजपेयी यांच्या उपस्थितीत पार पडली. मुख्यतः या बैठकीमध्ये संरक्षण मंत्रालया अंतर्गत असलेल्या एकूण 15 वेगवेगळ्या पी.एस. यु. चे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
प्रथम नाशिक डिफेन्स इनोवेशन सेंटर तर्फे श्री प्रदीप पेशकार यांनी बैठकीचे प्रास्ताविक करताना सर्व संचालक मंडळाचे ओळख करून देणे, यामध्ये सुरुवातीपासून च कार्यरत असलेले डॉक्टर प्रशांत पाटील श्री युवराज वडजे तसेच निमा अध्यक्ष श्री धनंजय बेळे आयमाअध्यक्ष श्री निखिल पांचाळ लघुउद्योग भारती अध्यक्ष श्री विवेक कुलकर्णी आणि अहमदनगर इंडस्ट्रियल असोसिएशन चे श्री कटारिया हे संचालक उपस्थित होते. हे सेंटर सर्व समावेशक व्हावे या उद्देशाने निमाच्या पुढाकाराने व तत्कालीन संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून 2019 मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेत सर्व संघटनांचा सहभाग घेऊन उद्योग सहसंचालक महाराष्ट्र शासन यांच्यासह वरील सर्व संघटनांचे अध्यक्ष यांचा संरक्षण मंत्रालयाच्या अनुमतीने स्थापन करण्यात आलेल्या एस पी व्ही म्हणजे विशेष हेतू वाहन कंपनीत समावेश करण्यात आलेला आहे.
आता NDIC -Nashik Defence innovation centre, Nashik चे स्वतंत्र कामकाज सुरू झाले असून संरक्षण मंत्रालयाच्या सर्व संबंधित यंत्रणांबरोबर भारतीयकरण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या याद्या घेणे, सर्व कंपन्यांबरोबर या संबंधीचे करार व नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट होत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या खाली दिलेल्या यादीप्रमाणे सर्व कंपन्यांचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते तसेच त्यांनी या कंपन्यांना व संरक्षण मंत्रालयाच्या विभागांना हव्या असलेल्या उत्पादनांच्या याद्या नाशिक डिफेन्स इनोवेशन सेंटर कडे दिल्या आहेत. कंपन्यांची यादी खालील प्रमाणे.
AVNL–आर्मर्ड व्हेइकल्स लिमिटेड ✓ TCL-ट्रूप कम्फर्ट लिमिटेड GIL–ग्लाइडर्स इंडिया लिमिटेड.✓ AWEIL- ॲडव्हान्स वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड
BDL–भारत डायनॅमिक्स लि.
BEL -भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.
BEML-भारत अर्थ मूव्हर्स लि. GRSE–गार्डन रीच शिपयार्ड्स आणि ईंजी.लि.
GSL–गोवा शिपयार्ड्स लि HAL-हिंदुस्तान ॲरोनेटिक्स लिमिटेड. HSL–हिंदुस्तान शिपयार्ड्स लि IOL–इंडिया ऑप्टेल लिमिटेड. MDL–माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि
MIDHANI – मिश्रा धातू निगम MIL–म्युनिशन्स इंडिया लिमिटेड✓
YIL. –यंत्र इंडिया लिमिटेड✓
आणि मंत्रालयाचे विभाग
हवाई दल मुख्यालय मुख्यालय ,
आर्मी मुख्यालय ,
नेव्ही मुख्यालय आदी सहभागी होते.
आतापर्यंत नाशिक विभागातील जवळजवळ 80 विविध उद्योजकांनी (NDIC) एन डी आय सी सोबत एनडीए (NDA) करार करून आपली संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात काम करण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचे प्रेझेंटेशन या बैठकीमध्ये सेंटरचे संचालक श्री युवराज वडजे यांनी दिले तसेच ज्या ज्या संरक्षण मंत्रालयाच्या कंपन्यांबरोबर संवाद व करार झाले आहेत त्यासंबंधीचे वृत्त सादर केले. डीडी पि चे जॉईंट सेक्रेटरी श्री अनुराग बाजपेयी यांनी पुढील एक महिन्यात सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना नाशिक येथे येऊन एन डी आय सी चे कामकाजाविषयी माहिती तसेच निमा आणि इतर संघटनांच्या सभासदांच्या कंपन्यांना भेट देऊन त्यांचे क्षमता चाचणी व वेंडर डेव्हलपमेंट प्रोसिजर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मे महिन्यामध्ये नाशिकमधील अनेक उद्योजकांना या साठी तयारी करावी लागणार आहे.
या बैठकीच्या दरम्यान विविध प्रश्न संबंधित चर्चा करताना प्रदीप पेशकार गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस म्हणजेच जेम GEM द्वारे खरेदी प्रक्रिया राबवताना च्या उद्योजकांनी उत्पादनाच्या संशोधनाचा आणि डेव्हलपमेंटचा खर्च केला असेल त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खरेदी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा श्री बाजपेयी यांनी सर्व शासकीय कंपन्यांना त्यासंबंधीचे कारवाई करण्याचे आदेश दिले आता यापुढे लघु उद्योजक संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादनाचे भारतीयकरण करताना गुंतवणूक करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे दिसून येईल.
नाशिक येथील विविध उद्योजक श्री मिलिंद खांदवे, श्री संजय जाखडी, श्री सचीन तरटे, श्री किरण सूर्यवंशी , श्री विलास बत्तीशे, श्री निखिल तापडिया, श्री आदित्य गोगटे श्री आनंद सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला.
नाशिक डिफेन्स इनोवेशन सेंटर मुळे अनेक लघु उद्योगांना या क्षेत्रात काम करण्याची संधी तसेच विविध स्तरावरील परवानग्या नोंदणी तसेच तपासणी इत्यादी साठी लघु उद्योगांना मदत मिळणार आहे. याबरोबरच संरक्षण मंत्रालयाच्या नवीन खरेदी धोरणानुसार मेक वन, मेक टू व मेक थ्री पद्धती च्या खरेदी प्रक्रिया सहभाग आणि इनोव्हेटिव्ह म्हणजेच अभिनव उत्पादनाच्या विकासासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. अनेक स्टार्टअप या क्षेत्रात काम करीत असतात त्यांच्या सुविधेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या iDex-DIO या विभागातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे.
यामुळे नाशिक विभागातील सर्व उद्योजकांनी व या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या स्टार्टप्सने या संधीचा लाभ घेण्यासाठी नाशिक डिफेन्स सेंटर च्या वेबसाईटला https://www.ndicindia.com भेट द्यावी आणि नोंदणी करावी अन्यथा ईमेल व्दारे संपर्क करून ([email protected]) आपले NDA करार करून घ्यावेत असे आवाहन सर्व संघटनांचे अध्यक्ष म्हणजेच नाशिक डिफेन्स इनोवेशन सेंटर च्या कार्यकारी मंडळांनी केले आहे. लवकरच यासंबंधीचा हेल्प डेस्क निमा, आयमा, लघुउद्योग भारतीच्या नाशिक कार्यालय आणि आमी या संघटनेच्या अहमदनगर कार्यालयात सुरू करू असे प्रदीप पेशकार यांनी सांगितले.
लवकरच नाशिक येथे इनोवेशन सेंटरच्या माध्यमातून विविध प्रकारची संरक्षण सामग्री उत्पादनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होईल अशी अपेक्षा सेंटरचे संचालक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली. या विषया संदर्भात सर्व तांत्रिक बाबी व त्याचे मार्गदर्शन सेंटर मार्फत केले जाईल याची माहिती श्री युवराज वडजे यांनी दिली.
Nashik Defence Innovation Centre Current Status