India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बिल्डर्स असोसिएशनच्या नाशिक चॅप्टर अध्यक्षपदी विजय बाविस्कर; अशी आहे नवी कार्यकारिणी

India Darpan by India Darpan
April 29, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देश निर्माण कार्यात कंत्राटदारांची मोलाची भूमिका असून कोविडच्या काळामध्ये देखील हॉस्पिटल तसेच अन्य सुविधांची उभारणी करून कंत्राटदारांनी गौरवपूर्ण कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (आय.ए.एस.) यांनी केले. ते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) नाशिक चॅप्टरच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष विजय बाविस्कर व सचिव प्रशांत सोनजे यांनी कार्यकारणीसहित पदभार स्वीकारला. याप्रसंगी मंचावर राज्य अध्यक्ष सचिन देशमुख, पश्चिम विभागीय उपाध्यक्ष सुनील मुंदडा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील मावळते अध्यक्ष अभय चोकसी हे उपस्थित होते. १९४१ ला स्थापन झालेल्या बीएआय चे आज देशभरात 30000 हून अधिक सदस्य असून “इंजिनियर्स कॅन मूव्ह दि वर्ल्ड” या उक्तीप्रमाणे सदस्य कार्य करत आहेत असेही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नमूद केले.

मागील वर्षाचे अहवाल वाचन करताना मावळते अध्यक्ष अभय चोकसी म्हणाले की, कोरोना काळात मिळालेल्या या पदामुळे समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली. बी ए आय नाशिक चॅप्टर तर्फे सिन्नर व गिरणारे येथे ऑक्सिजन प्लॅंटची उभारणी करण्यात आली. तसेच सदस्यांसाठी नियमित प्रशिक्षण देण्यासोबतच विविध प्रश्नांचा पाठपुरावा देखील शासन दरबारी संस्थेतर्फे करण्यात आला.
आपल्या भाषणात नूतन अध्यक्ष विजय बाविस्कर म्हणाले की, बी ए आय नाशिक चॅप्टर ची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बांधकाम उद्योगाची महत्त्वाची भूमिका असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देखील बांधकाम उद्योगामुळे मिळतो. आगामी वर्षात नाशिक बीएआय तर्फे स्किल डेव्हलपमेंट तसेच उद्योजकता विकास हे कार्यक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीएआय ची नूतन कार्यकारणी अशी –
अध्यक्ष – विजय बाविस्कर
सचिव – प्रशांत सोनजे
IPP – अभय चोकसी
उपाध्यक्ष – मनोज खांडेकर
खजिनदार – विलास निफाडे
सहसचिव – अविनाश आव्हाड, दीपक धाराराव
राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य – विलास बिरारी, मदन जगोटा, राजेंद्र गोठी, राजेंद्र मुथा, राहुल सूर्यवंशी.

Builder Association Nashik Chapter New Body


Previous Post

सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर अखेर ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल; खेळाडूंच्या लैंगिक छळाचे प्रकरण

Next Post

नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे काय झाले? ते कधीपर्यंत पूर्ण होईल?

Next Post

नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे काय झाले? ते कधीपर्यंत पूर्ण होईल?

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group