अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराकडून प्रेयसीचा विनयभंग
नाशिक – प्रेमप्रकरण थांबविल्याने प्रियकराने प्रियशीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मिडीयावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत संशयीताने सोशल साईटवर पाठलाग केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम उर्फ आसिफ उस्मान खान (३४ रा.तन्वीरनगर,मुंब्रा ठाणे) असे संशयीताचे नाव आहे. शहरात राहणारी पिडीत तरूणी आणि संशयीतामध्ये प्रेमसंबध होते. कालांतराने दोघांमध्ये वाद झाल्याने तरूणीने प्रेमप्रकरण थांबविले असता ही घटना घडली. १० फेब्रुवारी ते ३ डिसेंबर दरम्यान संशयीताने प्रेमप्रकरण थांबविल्यास दोघांचे खासगी व अश्लिल फोटो सोशल मिडीया,नातेवाईक व मित्रपरिवारास व्हायरल करण्याची धमकी दिली. या काळात संशयीताने पिडीतेच्या फेसबुक, व्हॉटसअप सारख्या सोशल साईडवर ईमेल आयडीच्या माध्यमातून पाठलाग करून तिचा मानसिक छळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार करीत आहेत.
कोणार्क नगरमध्ये तरुणीची आत्महत्या
नाशिक – कोणार्क नगर भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. चेतन चंद्रभान बोडके असे आत्महत्या करणाºया तरूणाचे नाव आहे. चेतन बोडके याने सोमवारी (दि.६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.