बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा…पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

by India Darpan
एप्रिल 30, 2025 | 4:30 pm
in क्राईम डायरी
0
crime 71

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामगार नगर येथील खूनाच्या घटनेत सहभागी अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले आहे. या घटनेतील पाच जणांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही हत्या सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याने सुपारी देवून घडवून आणल्याचे तपासात पुढे आले असून संशयित टोळक्यास अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

मोहन ज्ञानेश्वर वायचळे (१८ रा. तिरंगाचौक,कामगारनगर), राहूल राजू गडदे (२० मुळ रा.नांदूर कोंडार ता. नांदगाव हल्ली रिक्षा स्टॅण्ड जवळ आनंदवली) व साहिल पिंटू जाधव (२१ रा.माळीवाडा आनंदवली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार पोलीसांच्या ताब्यात आहेत. सिडकोतील कामटवाडा येथील स्मशानभूमी भागात सोमवारी (दि.२८) करण उमेश चौरे (वय १७, रा. संत कबीरनगर) या अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. चौरे याचा कामगार नगर भागात ८ मार्च रोजी झालेल्या अरूण बंडी या युवकाच्या खून प्रकरणात समावेश असल्याने त्याची रवानगी बालगृहात करण्यात आली होती.

१९ एप्रिल रोजी तो बालगृहातून जामिनावर बाहेर येताच जीवाला धोका असल्याने तो कामटवाडा भागात राहणा-या आपल्या मित्राच्या घरी वास्तव्यास होता. याची कुणकुण प्रतिस्पर्धी टोळक्यास लागल्याने खून का बदला खून या भावनेतून ही हत्या झाली होती. हल्लेखोर टोळक्यानेही चौरे या निर्घृण खून करीत बदला घेतला रे असे म्हणत धुम ठोकली होती. या घटनेची दखल घेत पोलीस हल्लेखोरांच्या मागावर असतांना युनिट १ चे हवालदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयित टोळके गंगापूररोडवरील आसाराम बापू पुल परिसरात थांबले असून ते भुमिगत होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने घटनास्थळ गाठून घटनेनंतर अवघ्या चार तासाच्या आत तीघा संशयितांना बेड्या ठोकत त्यांच्या अल्पवयीन दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे.

सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याची संशयितानी कबुली दिली असून त्यांना अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये,उपनिरीक्षक चेतन श्रीवत,सुदाम सांगळे हवालदार प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,संदिप भांड,प्रशांत मरकड,विशाल काठे,नाझीमखान पठाण,योगीराज गायकवाड,रोहिदास लिलके पोलीस नाईक विशाल देवरे,मलींदसिंग परदेशी अंमलदार मुक्तार शेख,अमोल कोष्टी,राम बर्डे अनुजा येलवे,सुक्राम पवार व समाधान जाधव आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

Next Post

नाशिक- कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करा, दुरांतो एक्सप्रेसला थांबा द्या…नाशिकच्या बंगाली समाजाची मागणी

India Darpan

Next Post
unnamed 2

नाशिक- कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करा, दुरांतो एक्सप्रेसला थांबा द्या…नाशिकच्या बंगाली समाजाची मागणी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011