नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळय़ा भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ,भद्रकाली,अंबड सातपूर व आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोडवरील राहू हॉटेल भागात राहणारे गोपाल सुकदेव कांबळे यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ एफझेड ५४३६ सोमवारी (दि.२८) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना भद्रकालीतील काझीपुरा भागात घडली. मोईनुद्दीन फकिर मोहम्मद शेख (रा.विठ्ठल मंदिराजवळ काझीपुरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची अॅक्टीव्हा एमएच १५ ईटी ६८०९ गेल्या शुक्रवारी (दि.२५) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली.
तिसरी घटना याच भागातील पिंजार घाट परिसरात घडली. नाजीम अहमद अमीर शेख (रा.हुसेनी चौक,पिंजारघाट रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाजीम शेख यांची स्प्लेंडर एमएच १५ डीडी ११४८ गेल्या गुरूवारी (दि.२४) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनाांबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार महाले व सोळसे करीत आहेत.
चौथी घटना औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात घडली. संतोष खंडू दळवी (रा.रजा हाईटस समोर अंबड लिंकरोड संजीवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दळवी यांची पल्सर एमएच १५ जेबी ९४३३ गेल्या बुधवारी (दि.२३) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमघ्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत. तर गणेश नवनाथ पवार (रा.राधाकृष्णनगर,अशोकनगर) यांची पल्सर एमएच १५ जेजे ७१२९ गेल्या शनिवारी (दि.२६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.