नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हात पकडून आपल्या घरात ओढून नेत शेजा -याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली याप्रकरणी अबड पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. महिन्याभरात सिडकोतील ही दुसरी घटना असून परिसरात महिलां मुलीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अंबड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पीडितेच्या घरा शेजारीच रहातो. पीडित मुलगी रविवारी (दि 4) आपल्या घरात एकटी होती. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयित तिच्या घरात घुसला, यावेळी संशयिताने मुलीचा हात पकडुन, खेचत स्वतःच्या घरी घेऊन गेला. तीला दमदाटी करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
Nashik Crime Minor Girl Rape Cidco Police